शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षियांतर्फे श्रद्धांजली

By admin | Updated: June 6, 2014 01:10 IST

हिंगोली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्ल श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या.

हिंगोली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्ल श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या. यावेळी सर्वपक्षियांतर्फे मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरातील महात्मा गांधी चौकात गुरूवारी घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत सर्वपक्षांचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. शोकसभेस नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. च्या अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी आ. गजानन घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, भाजप कार्यकारणी सदस्य तान्हाजी मुटकुळे, बाजार समिती उपसभापती रामेश्वर शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, पं. स. चे उपभापती विनोद नाईक, नगरसेवक बिरजू यादव, गणेश बांगर, अनिल नैनवाणी, जैठानंंद नैनवाणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, प्रकाशचंद्र सोनी, धरमचंद बडेरा, गोवर्धन विरकुँवर, पुंजाजी गाडे, संजय दराडे, माधव कोरडे, उमेश गुठ्ठे, डॉ. श्रीधर कंदी, अ‍ॅड. गणेशराव ढाले, डॉ. राजेश भोसले, सुरेशअप्पा सोनी, शरद जयस्वाल, सदाशिव सुर्यतळ, डॉ. उमेश नागरे, सुभाष लदनिया, सुरजितसिंह ठाकूर, डॉ. विजय निलावार, अशोकराव दिंडे पाटील, दत्तराव दिंडे, सूर्यभान ढेंगळे, उत्तमराव जगताप, प्रमोद मंदडा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजू गोडबान, शिक्षक संघटनेचे रमेश गंगावणे, गोविंद गुठ्ठे, काँग्रस प्रवक्ते विलास गोरे, अ‍ॅड. के. के. शिंदे, पांडुरंग पाटील, उत्तमराव जगताप, देशपांडे, गोपाल दुबे, जोशी, रविकुमार कान्हेड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शोकसभेत नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून भावना व्यक्त केल्या. मुंडे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे नव्हे तर देशाचे नुकसान झाले.
भाजपात बहुजनांना स्थान देवून कार्यकर्त्यांना मोठे करणार्‍या लोकनेत्याच्या जाण्यामुळे झालेले दु:ख अनेकांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन फुलाजी शिंदे यांनी केले.
सेनगाव येथेही गोपीनाथ मुंडे यांना एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपाचे नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे व भाजपाचे मोठे नेतृत्व हरवले असून येणार्‍या काळात मराठवाड्याचा हा भूमीपुत्र नक्कीच मुख्यमंत्री झाला असता.
हिंगोली जिल्हा निर्मितीत गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा असून त्यांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झाला असल्याची भावना हिंगोली मतदारसंघाचे माजी आ. बळीराम पाटील कोटकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)