जीटीएलच्या कागदपत्रांची होळी

By Admin | Updated: December 4, 2014 00:25 IST2014-12-04T00:25:14+5:302014-12-04T00:25:14+5:30

औरंगाबाद : शहराला साडेतीन वर्षे वीजपुरवठा करणाऱ्या जीटीएलने चिकलठाणा कार्यालयात बुधवारी काही कागदपत्रांची होळी केली. यामध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता.

Holi of GTL documents | जीटीएलच्या कागदपत्रांची होळी

जीटीएलच्या कागदपत्रांची होळी

औरंगाबाद : शहराला साडेतीन वर्षे वीजपुरवठा करणाऱ्या जीटीएलने चिकलठाणा कार्यालयात बुधवारी काही कागदपत्रांची होळी केली. यामध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता.
जीटीएलने २०११ मध्ये शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला होता. आता थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने पुन्हा वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. जीटीएलने कागदपत्रांच्या केलेल्या होळीत वीजचोरी प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्रे जाळली आहेत. त्याचसोबत काही मीटरही जाळल्याचे दिसून आले. कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई करून जप्त केलेले मीटर आणि त्यासंबंधी कागदपत्रे का जाळली जात आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. जीटीएलच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळाची आणि हस्तांतरणाची थर्ड पार्टीकडून तपासणी करावी, अशी मागणी कर्मचारी कृती समितीने केली आहे. या मागणीची धास्ती घेऊन जीटीएलने कागदपत्रे जाळली आहेत, असे महावितरणच्या काही कामगार नेत्यांचे मत आहे. विशेष म्हणजे कागदपत्रे जाळताना कोणताही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसताना फक्त दोन कर्मचारी पोते भरून आणलेली कागदपत्रे फाईलमधून काढून बराच वेळ जाळत होते.

Web Title: Holi of GTL documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.