शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

धारकल्याणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले

By admin | Updated: December 22, 2014 23:42 IST

जालना : भुतान येथील इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत भारताच्या संघाने चमकदार कामगिरी करीत चषकावर नाव कोरले. त्या विजेत्या संघात धारकल्याण (ता.जालना) येथील खेळाडू सहभागी होते.

जालना : भुतान येथील इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत भारताच्या संघाने चमकदार कामगिरी करीत चषकावर नाव कोरले. त्या विजेत्या संघात धारकल्याण (ता.जालना) येथील खेळाडू सहभागी होते.भूतान येथे १२ डिसेंबरपासून १७ वर्ष वयोगटातील टार्गेट बॉल स्पर्धा सुरु झाल्या. रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघाने चार सामन्यापैकी ३ सामने जिंकून इंडो-भूतानवर मात केली. मुलींच्या संघाने सहा पैकी चार सामने जिंकले. या खेळाडूंमध्ये विशाल विष्णू ढोबळे, रेणुका कळकुंबे, साक्षी क्षीरसागर, सविता म्हस्के यांचा समावेश असून हे चौघेही जालना तालुक्यातील धारकल्याणचे रहिवाशी व रंगनाथ महाराज हायस्कूल नाव्हाचे विद्यार्थी आहेत.सदर खेळाडू परतल्यानंतर त्यांचा धारकल्याण येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यावेळी रंगनाथराव ढोबळे, रावसाहेब इंगोले, रामप्रसाद डोंगरे, विष्रू ढोबळे, अमर डांगे, ज्ञानेश्वर इंगोले, बबनराव मिसाळ, मुक्तार पठाण, राजेंद्र ढोबळे, कारभारी एखंडे, प्रशांत नवगिरे, हरिभाऊ ढोबळे, सुंदर इंगोले, अशोक ढोबळे, रखमाजी ढोबळे, उध्दव इंगोले, काकासाहेब उगले, विष्रू घोडके, प्रभाकर तिरुखे, नासेर पठाण ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या मुलांच्या यशात प्रशिक्षकांचा निश्चितच मोठा वाटा असल्याचे मत विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केले. या स्पर्धांमधून सांघिक खेळाची भावना महत्वपूर्ण ठरल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) सब ज्युनिअर टार्गेट बॉल स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी सहा महिने मोठे कष्ट करावे लागले. मेहनत आणि सांघिक भावनेमुळेच हे यश संपादन करता आले.- प्रशांत नवगिरे (प्रशिक्षक)ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्यातील सुप्त गुणे लक्षात येणार नाहीत. येथील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन करून धारकल्याण सारख्या गावासह जिल्ह्याचा नावलौकिक केला. यशस्वीतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.- रावसाहेब इंगोले (सरपंच)