शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:06 IST

तुमची कार रस्त्यावर उभी करताय? सावधान! उस्मानपुऱ्यात अर्ध्या तासांत दोन आलीशान गाड्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या काही मिनिटांत हायटेक पद्धतीने कार चोरणाऱ्या टोळीने शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून सहा दिवसांत दुसऱ्यांदा न्यू श्रेयनगर व उस्मानपुऱ्यातून मंगळवारी रात्रीतून अवघ्या अर्ध्या तासांत २५ लाखांच्या दोन कार चोरून नेल्या. या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढवली असून पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर तिवारी हे कुटुंबासह न्यू श्रेयनगरमध्ये राहतात. २०२३ मध्ये त्यांनी टाटा हॅरिअर कार खरेदी केली होती. घरासमोर पार्किंग नसल्याने ते त्यांची कार मित्र व नगरसेवक राजू वैद्य यांच्या घरासमोर उभी करत होते. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे कार वैद्य यांच्या घरासमोर उभी करून घरी चालले गेले. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी वैद्य यांच्या पत्नीला घरासमोर काचा आढळल्या. संशय बळावल्याने त्यांनी सागर यांच्या पत्नीला विचारणा केली. सागर तेथे पोहोचले. तेव्हा चोरांनी दरवाजाच्या काचा फोडून कार चोरून नेल्याचे दिसून आले.

लगेच दुसरी कार चोरलीनगरसेवक वैद्य यांच्या घरासमोरून चोरांनी ३ वाजून २६ मिनिटांनी अवघ्या १० मिनिटांत कार लंपास केली. त्याच्या अर्ध्या तासानंतर दशमेशनगरमध्ये राहणारे विवेकानंद भोसले यांची देखील ४ वाजता टाटा हॅरियर कंपनीचीच कार चोरून नेली. नगरसेवक राजू वैद्य यांनी तत्काळ पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही घटनांप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हातात टॅब/मशीन, दोघांची हालचाल कैद११ रेाजी उस्मानपुरा, जवाहरनगरमधूनच दोन कार चोरीला गेल्या. त्यानंतर 'लोकमत' ने 'हायटेक कार चोरी' संदर्भात वृत्त प्रकाशित केेले. यातील एक कार विद्यमान आमदारांच्या निवासस्थानासमोरूनच गेली. मंगळवारी रात्रीच्या घटनेत दोन चोर स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यात एक चोर निवांत हातात टॅब/ओबीडी डिव्हाइस, रिलेबॉक्स हातात घेऊन कारमध्ये बसून कार सुरू करून पसार झाला. विशेष म्हणजे, कार चोरीसाठी चोरांची टोळी अलिशान कारमधूनच रेकी करत शहरात फिरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Hi-tech thieves steal two cars in Chhatrapati Sambhajinagar using tabs.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces a surge in hi-tech car thefts. Thieves stole two Tata Harrier cars worth ₹25 lakh within half an hour using electronic devices, prompting concern among residents and posing a challenge to the police. CCTV footage captured the thieves using a tablet-like device.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर