शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील उच्चभ्रू तरुणांमध्ये ‘हायड्रो गांजा’चे खुळ; दहा हजार रुपये प्रतिग्रॅम विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 20:22 IST

विदेशी हायड्रो गांजाचा छत्रपती संभाजीनगरात शिरकाव; संगणक अभियंत्यासह ‘एमबीए’ उत्तीर्ण तरुण बनले स्मगलर्स, स्नॅपचॅटवरून ऑर्डर

छत्रपती संभाजीनगर : सामान्य गांजासोबत आता विदेशात निर्मिती होत असलेल्या ‘हायड्रो गांजा’ची शहरात नशा केली जात आहे. उच्चभ्रू वसाहत, बड्या महाविद्यालयांतील विद्यार्थी याच्या आहारी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एन-४ मधील राजवीर चरणसिंग बिरग (२०) व ओम रवींद्र शिंदे (२३) हे या हायड्रो गांजाचे शहरातील स्मगलर्स बनले होते. गुन्हे शाखेने मंगळवारी त्यांना रंगेहाथ अटक करून त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त केला.

शहरात विदेशी हायड्रो गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, प्रवीण वाघ, अभिजित चिखलीकर यांनी सापळा रचला. मंगळवारी रात्री छावणीच्या लोखंडी पुलावर राजवीर, ओम येताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. राजवीरच्या पाठीवरील बॅगेत गांजाची ८ पाकिटे, एक छोटा वजनकाटा मिळाला. त्यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुशिक्षित, सधन कुटुंबाची पार्श्वभूमी- राजवीर, ओमला सुशिक्षित, सधन कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. दोघांचे कुटुंब शासकीय सेवा, तसेच कायदे क्षेत्रात कार्यरत आहेत. २० वर्षीय राजवीर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतो.- २३ वर्षीय ओमने पुण्यातीलच महाविद्यालयातून ‘एमबीए’ची पदवी घेतली असून, सहा महिन्यांपासून शहरात वास्तव्यास आहे. पुण्याला त्याचे सतत येणे-जाणे असते. तेथील वास्तव्यामध्येच नशेच्या आहारी जाऊन ते स्मगलर्सच्या संपर्कात आले.

स्नॅपचॅट, टेलिग्रामद्वारे संपर्क; आठ जणांचे फंडिंग- ओम, राजवीरसह त्यांचे मित्र ओम जाधव (रा. सातारा परिसर), चैतन्य (रा. कांचनवाडी), ओम कासलीवाल (रा. एपीआय कॉर्नर), दर्शन मदगे (रा. मुकुंदवाडी), मित राजपूत (रा. एन-४) हे पैसे गोळा करून राजवीर, ओमला देत होते.- स्नॅपचॅटवर जॉली नावाच्या प्राेफाइलवर ऑर्डर देऊन ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील स्मगलर्सची भेट घेऊन गांजा शहरात आणत.- साधारण ५ ते ६ हजार प्रतिग्रॅम विकत घेऊन ते शहरातील उच्चभ्रू वसाहत, बड्या महाविद्यालयांतील मुलांना प्रतिग्रॅम १५ हजारांपर्यंत विकत होते. त्यामुळे आता या महागड्या गांजाचे सेवन व विक्री करणाऱ्या बड्यांच्या मुलांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

काय असतो हायड्रो गांजा?- हायड्रो गांजा हायड्रोपोनिक पद्धतीने म्हणजेच मातीत न पिकवता पोषक रसायन, घटक टाकलेल्या पाण्यात पिकवला जातो.- बंद घर, गोडाउन, बंगल्यात, अगदी छोट्या खोलीतही याचे उत्पादन घेतात. विविध एलईडी, एचआयडी लाइट्सचा वापर करून तापमान, आर्द्रता आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कृत्रिमरीत्या नियंत्रित केल्याने यात ‘टीएचएसी’चे प्रमाण अधिक असते.- सामान्य गांजामध्ये टेट्राहायड्रोकॅनॅबिनॉल (टीएचसी)चे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांदरम्यान, तर हायड्रो गांजामध्ये ३०-४५ टक्क्यांपर्यंत जाते. त्यामुळे त्याची नशा अधिक तीव्र मानली जाते.

टेट्राहायड्रोकॅनॅबिनॉल नेमके काय करते?- ३० टक्क्यांपेक्षा अधिकचा टीएचसी थेट व सामान्य गांजाच्या तुलनेत अधिक गतीने मेंदूवर परिणाम करतो.- याच्या सेवनानंतर शरीरात उत्साह संचारतो. रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. अनेकदा अनियंत्रित हसणे व बडबडही सुरू होते.- अनेकदा अतिसेवनाने मानसिकतेप्रमाणे भ्रम निर्माण होतात. विचार प्रक्रिया मंदावते.- यामुळे स्मरणशक्ती कमी होणे. चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढून, ब्रेन स्ट्रोक येऊन मृत्यू ओढवतो.

दहापट अधिक दर- साधा गांजा : १ ते ३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम- हायड्रो गांजा : ५ ते १५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम

विदेशातून तस्करीहायड्रो गांजाची मुख्यत्वे विदेशातून तस्करी होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंगळुरू पोलिसांनी बँकॉकहून आलेला सहा कोटींचा हायड्रो गांजा विमानतळावर पकडला. जुलै २०२५ मध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तरुणांमधील हायड्रो गांजाच्या वाढत्या नशेवर चिंता व्यक्त केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : High-end Hydro Weed Craze Grips Aurangabad Youth; Sold at ₹10,000/Gram

Web Summary : Aurangabad bust: Two arrested for selling high-end 'hydro weed' to affluent students. The smugglers used social media to connect with suppliers in Mumbai and sold the drug for huge profits. Police are now targeting wealthy consumers.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर