शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी

By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST

परभणी : येथील जिल्हा परिषदेत परिचर पदाच्या लेखी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल,

परभणी : येथील जिल्हा परिषदेत परिचर पदाच्या लेखी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. परभणी जिल्हा परिषदेत परिचर पदाच्या १९ रिक्त जागांसाठी १९ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचे संच सीलबंद नसल्याने पेपर फुटल्याच्या प्रकरणावरुन गोंधळ उडाला होता. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या संदर्भातील लक्षवेधी जिंतूरचे आ.विजय भांबळे, गंगाखेडचे आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केली. ते म्हणाले की, काही केंद्रावर उमेदवारांना अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. तर काही ठिकाणी १० ते १५ मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हॉटस्अ‍ॅपवर या प्रश्नपत्रिका आल्या. तसेच भरती प्रक्रियेदरम्यान दलालांनी १० ते १५ लाख रुपये घेतले. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या लक्षवेधीवर उत्तर देताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाईल. तसेच दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. माजीमंत्री जयंत पाटील यांनी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जि. प. चे प्रमुख या नात्याने सर्वस्वी जबाबदार असून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)