शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

अहो आश्चर्यम रविवारीही उचलला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:31 AM

मागील काही दिवसांपासून कचरा उचलणा-या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा, जागेवर दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारीही शहरातील विविध भागांतील कचरा उचलण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक सुटीचे कारण दाखवून आजपर्यंत महापालिका शहरातील कचरा उचलत नव्हती. मागील काही दिवसांपासून कचरा उचलणा-या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा, जागेवर दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारीही शहरातील विविध भागांतील कचरा उचलण्यात आला. ज्या ठिकाणी कचरा उचलण्यात आला तेथे औषध फवारणी, कीटकनाशक फवारणी करण्यात आल्याचे चित्र पाहून औरंगाबादकरांना सुखद धक्काच बसला.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरात कचरा उचलण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला. शहराच्या अनेक वसाहतींमधील कचराकुंड्याच गायब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोअर टू डोअर कलेक्शन सुरू करण्यात आले. १३० आॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. दरवर्षी मनपा कचरा उचलण्याच्या प्रक्रियेवर सर्वाधिक ३६ कोटी रुपये खर्च करीत आहे. एवढे करूनही शहरात जिकडे तिकडे कच-याचे डोंगर दिसून येत होते. लोकप्रतिनिधींनीही कच-याचे डोंगर नष्ट व्हावेत यासाठी प्रशासनासोबत बरेच प्रयत्नही केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली.मागील आठ दिवसांपासून नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांनी पहाटे ५ वाजेपासून कचरा उचलण्याच्या प्रक्रियेची पाहणी सुरू केली. या पाहणीत अत्यंत बारीक सारीक त्रुटी दुरुस्त करण्यात येत आहेत. मनपाच्या सर्व वाहनांना लवकरच जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मध्यवर्ती जकात नाका येथून सकाळी ५ वाजता सर्व मोठी-लहान वाहने कचरा उचलण्यासाठी बाहेर पडत आहेत. साफई मजूर मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते झाडून काढत आहेत. मनपाने जुन्या यंत्रणेचा वापर करीत कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत काहीअंशी बदल घडवून आणला आहे. रविवारी काही भागात कचरा उचण्यात आला, अन्यथा शनिवारी आणि रविवारी कचरा उचलण्यात येत नव्हता.रविवारी महापौरांनी रंगारगल्ली, समर्थनगर, शहागंज, टीव्ही सेंटर आदी भागात भेट देऊन कचरा उचलण्यास भाग पाडले.