आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:42+5:302021-07-18T04:04:42+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी शासनाच्या वतीने उभारी योजना राबविली जात आहे. फुलंब्री तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी शासनाच्या वतीने उभारी योजना राबविली जात आहे. फुलंब्री तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत दिली जात आहे. यावेळी तहसीलदार शीतल राजपूत, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ, कचरू काथार, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक पवार, अव्वल कारकून शिवाजी ढेपले हे उपस्थित होते.
तालुक्यातील सुनील सुलताने, काशिनाथ सुस्ते, काकासाहेब थोरात, भानुदास करपे, बाळू हुंडीवाले, चंद्रभान नागरे, अशोक काळे, अजिनाथ बोलकर, अशोक लहाने, सोमिनाथ दानवे, रामेश्वर बलांडे, पवन लहाने या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. तहसील कार्यालयाच्या वतीने सातत्याने शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. तसेच समाजातील दानशूरांनीदेखील मदतीसाठी सामोरे यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी केले.
170721\tahsil phu.jpg
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करताना तहसीलदार