शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

छत्रपती संभाजीनगरात पावसाचा धुमाकूळ; हर्सूल तलाव एका रात्रीत तुडुंब, खाम नदीला पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:04 IST

शहर परिसरातील आठही मंडळांत म्हणजेच सुमारे १६० वसाहतींमध्ये अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चारही दिशांना शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत झालेल्या पावसाने हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला. पूर आल्यामुळे खाम नदीलगतच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात ५८ मि.मी., तर जिल्ह्यात ११० मि.मी. पाऊस झाला.

शहर परिसरातील आठही मंडळांत म्हणजेच सुमारे १६० वसाहतींमध्ये अतिवृष्टी झाली. शहरातील काही वसाहतींमध्ये नागरिकांनी रात्र जागून काढली. आपत्ती व्यवस्थापनासह सर्व यंत्रणांकडून रविवारी दुपारपर्यंत बचावकार्य सुरू होते. हर्सूल तलाव भरून वाहू लागल्याने परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मनपाने या परिसरात सुरक्षारक्षक तैनात केले.

कुठे किती पाऊस?शहर परिसर ८७ मि.मी., उस्मानपुरा ८७, भावसिंगपुरा ९९, कांचनवाडी १४२, चिकलठाणा ६६, चौका १००, पंढरपूर ८२, पिसादेवी ६६, वरूड काझी ६६ मि.मी.

ईटखेडा जलमयशनिवार रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ईटखेडा वॉर्डातील रेवती अभिनंदन हौसिंग सोसायटी, श्रीरंग सिटी, जगदाळे मळा, सेंट जॉन शाळेजवळील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शिवसमाधान कॉलनी येथे पाणी साचल्यामुळे ईटखेडा गावाला जोडणारा मुख्य रस्ता बंद झाला. स्मशानभूमीतही पाणी साचले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. परिसरातील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमित केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पाणी वसाहतींमध्ये शिरले. प्रशासकांनी संबंधित यंत्रणेला नाल्यावरील झालेले अतिक्रमण काढून नाले मोकळे करण्याचे आदेश दिले.

शहरातील १४ वॉर्डांचा पाणीप्रश्न मिटलाहर्सूल तलावाची पाणी पातळी दोन दिवसांपूर्वीच २६ फूट होती. रविवारी पहाटे तो ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्ण भरल्यामुळे शहरातील १४ वॉर्डांचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. तलावाची पाणीपातळी २८ फूट आहे. ९ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून त्यातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही हर्सूल तलाव भरला नव्हता.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rain Lashes Chhatrapati Sambhajinagar, Harsul Lake Overflows

Web Summary : Torrential rains flooded Chhatrapati Sambhajinagar, overflowing Harsul Lake overnight. Kham River surged, prompting alerts. Itkheda faced severe waterlogging. The lake's overflow resolves water issues for 14 wards.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhersul lakeहर्सूल तलावRainपाऊसfloodपूर