शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांसह पायभूत सुविधांना फटका, मराठवाड्याला भरपाईसाठी ७५० कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:52 IST

जुलै महिन्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधा कोलमडल्या 

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ४ लाख ४३ हजार ७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान आजवर झाले आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दुप्पट नुकसानभरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी जाहीर केले. त्यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागतील. विभागीय प्रशासनाने ३१० कोटींच्या नुकसानीचा अहवाल ३१ जुलै रोजी शिंदे यांना सादर केला होता.

गेल्या महिन्यात विभागीय आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील खरीप पीक नुकसानासह बाधित झालेल्या पायाभूत सुविधांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. शेती नुकसानभरपाईसाठी ३०८.८ कोटी, बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी अशा ७४२.४४ कोटींची मागणी प्रशासनाने केली आहे. ही मदत कमी असून मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव मदतीचा विचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी घोषणा केली.

अतिवृष्टी व पुरामुळे ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचे ४ लाख ४३ हजार हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे, तर दीड हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, मोबदल्यासाठी ३०८.८ कोटींचा निधी लागणार आहे, तर नांदेडमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी लागेल, असा प्राथमिक अहवाल आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिरायतीसाठी सहा हजार ८०० रुपये हेक्टरी मदत मिळते. बागायतीसाठी १३ हजार ५०० प्रति हेक्टर तर फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची तरतूद आहे. यात किती वाढ होते, त्याकडे लक्ष आहे.

मागील वर्षी दिली होती ३५८५ कोटींची मदतमराठवाड्यात मागील चार वर्षांपासून जास्तीच्या पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे वारंवार अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला फटका बसत आहे. यंदा जुलैमध्येच विभागातील एकूण १३ टक्के कृषी क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर या सहा जिल्ह्यांत खरीप पिकाला फटका बसला. मागील वर्षी पूर्ण पावसाळ्यात ३६ लाख ५२ हजार ८७२.९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. ४४ लाख ४७ हजार १६१ शेतकऱ्यांना ३ हजार ५८५.४२ कोटींची मदत शासनाने दिली होती.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा