शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:17 IST

जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून रुसलेल्या पावसाने गुरुवारी (दि.५) अखेर पुन्हा एकदा परतत शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुवून काढले.

ठळक मुद्दे४४.८ मि.मी.ची नोंद : तेरा दिवसांनंतर हजेरी, ठिकठिकाणी साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून रुसलेल्या पावसाने गुरुवारी (दि.५) अखेर पुन्हा एकदा परतत शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुवून काढले. शहर आणि परिसरात दुपारी २.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्या स्वरुपात हजेरी लावल्यानंतर जवळपास दीड तास जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत ४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली.१३ दिवसांपासून पाऊस नुसता हुलकावणी देत होता. जूनच्या प्रारंभीचे दोन दिवस आणि २१ व २२ जून रोजी जोरदार पाऊस झाला होता. या पावसाने शहरातील अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. दररोज केवळ पावसाची अधूनमधून काही मिनिटांसाठीच हजेरी लागत होती. शहरात ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता रिमझिम बरसणाऱ्या पावसाने ढगाच्या गडगडाटासह चांगलाच जोर धरला. जवळपास दीड तास पावसाने चांगलीच शहरात हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. परंतु पावसाच्या हलक्या स्वरुपातील धारा सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होत्या.पावसाने पाठ फिरविल्यामुळे रेनकोट, छत्र्यांशिवाय नागरिक बाहेर पडत होते. त्यांची आजच्या पावसाने चांगलीच धावपळ उडाली. पावसाला सुरुवात होताच मिळेल त्या जागेचा आडोसा घेण्याची वेळ पादचारी आणि वाहनचालकांवर आली. पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली. जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपात जवळपास सुमारे अडीच तास बरसलेल्या पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. चांगला पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील जिल्ह्यातील ५० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. आगामी काही दिवस चांगला पाऊस पडून पेरण्या करणे शक्य होणार आहे.सातारा परिसर जलमयजोरदार पावसामुळे सातारा परिसरातील अनेक वसाहतींकडे जाणाºया रस्त्यांवर पाणी साचले. रेणुकामाता कमान पासून ते म्हाडाकडे जाणाºया रस्त्यावर चाटे स्कूलसमोर चिखलमय रस्ता सुकला होता. आजच्या पावसाने पुन्हा हा रस्ता चिखलाने भरुन गेला आहे.दरम्यान जोरदार पावसामुळे गेल्या आठवड्यात नारेगावच्या ज्या वसाहतींमध्ये पाणी शिरले होते, त्या भागातील नागरिकांमध्ये घबराट होती.वेदांतनगरात झाड कोसळलेपावसामुळे वेदांतनगर परिसरात झाड कोसळले. या प्रकाराविषयी नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. तर औरंगपुरा, जालना रोडसह शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. त्यातून ये-जा करताना वाहनचालक, पादचाºयांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसामुळे अनेकांची वाहने बंद पडली. त्यामुळे वाहने ढकलत नेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद