मतमोजणी केंद्रावर आरोग्य पथक
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:49+5:302020-12-04T04:12:49+5:30
महिनाभरात २०२ रुग्णांचे एमआरआय औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये एमआरआयची सुविधा कार्यान्वित झाली आहे. महिनाभरात याठिकाणी २०२ रुग्णांचे ...

मतमोजणी केंद्रावर आरोग्य पथक
महिनाभरात २०२ रुग्णांचे एमआरआय
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये एमआरआयची सुविधा कार्यान्वित झाली आहे. महिनाभरात याठिकाणी २०२ रुग्णांचे एमआरआय करण्यात आले. खाजगी रुग्णालयात यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. घाटीतील सुविधेने गोरगरीब रुग्णांना आधार मिळत आहे.
एसटीतील पीएफ घोटाळा
‘एफआयआर’ची प्रतीक्षा
औरंगाबाद : एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम हडपल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली; परंतु अद्यापही याप्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. हा एफआयआर कधी दाखल होतो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रेल्वेस्टेशनसमोरील चौकात
जलवाहिनीला गळती
औरंगाबाद : रेल्वस्टेशनसमोरील चौकात जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन गळती थांबविण्याची मागणी होत आहे.
पथदिव्याचा खांब
दुभाजकात पडून
औरंगाबाद : चेतक घोडा चौकाजवळ दुभाजकात पथदिव्याचा खांब गेल्या काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत पडून आहे. हा खांब दुभाजकात एका बाजूला वाकला आहे. अपघात होण्यापूर्वी हा खांब हटविण्याची मागणी होत आहे.