आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोटाळा, परीक्षार्थींना फोनद्वारे उत्तरे सांगणारे रॅकेट औरंगाबादेत उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 01:13 PM2021-02-28T13:13:12+5:302021-02-28T13:15:25+5:30

गेवराई तांडा येथे एका केंद्रावर एका परीक्षार्थीला पकडण्यात आले होते.

Health department exam scam exposed, racket of answering candidates by phone exposed in Aurangabad | आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोटाळा, परीक्षार्थींना फोनद्वारे उत्तरे सांगणारे रॅकेट औरंगाबादेत उघडकीस

आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोटाळा, परीक्षार्थींना फोनद्वारे उत्तरे सांगणारे रॅकेट औरंगाबादेत उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देचिकलठाणा पोलिसांनी खोकडपुरा येथील गजानन अभ्यासिकेवर धाड टाकली. पोलिसांना या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रति , पुस्तके सापडली आहेत.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या रिक्त पदांसाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहे. या परीक्षेत ऑनलाइन पद्धतीने परीक्षार्थींना उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा औरंगाबादेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खोकडपुरा येथील एका अभ्यासिकेवर छापा टाकून पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. जवळपास ८ ते १० युवकांनी मिळेल त्या जागेतून उद्या मारून पळ काढल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.

याविषयी प्राथमिक माहिती अशी, गेवराई तांडा येथे एका केंद्रावर एका परीक्षार्थीला पकडण्यात आले होते. त्याच्याकडून मिळलेल्या माहितीवरून चिकलठाणा पोलिसांनी खोकडपुरा येथील गजानन अभ्यासिकेवर धाड टाकली. त्यावेळी अभयसिकेला बाहेरून कुलूप होते. परंतु आतमध्ये काही जण होते. पोलिसांची चाहूल लागताच मिळेल त्या जागेतून त्यांनी पळ काढला. पोलिसांना या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रति , पुस्तके सापडली आहेत. याठिकाणी आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचीही नावे सापडल्याचे समजते.

Web Title: Health department exam scam exposed, racket of answering candidates by phone exposed in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.