सावधान, पोलीस तयार...

By Admin | Updated: October 15, 2014 00:47 IST2014-10-15T00:38:57+5:302014-10-15T00:47:31+5:30

औरंगाबाद : निवडणूक पूर्व आवश्यक दक्षतेची कामे पोलिसांनी निपटली असून, उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सहज निपटण्याचा महिनाभर कसून सराव केला.

Heads up, make the police ... | सावधान, पोलीस तयार...

सावधान, पोलीस तयार...

औरंगाबाद : निवडणूक पूर्व आवश्यक दक्षतेची कामे पोलिसांनी निपटली असून, उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सहज निपटण्याचा महिनाभर कसून सराव केला. त्याशिवाय अवैध पैसे, शस्त्रे, शस्त्रपरवाने जप्त व जमा करण्यात आले. अवैध दारू अड्ड्यांवर छापे, हिस्ट्रीशिटर्स आरोपींना अटक, वॉरंट, समन्स बजावून प्रतिबंधक कारवाई करून गुन्हेगारांसह समाजकंटकांवर पोलिसांनी जरबही बसविली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि.१२ सप्टेंबर रोजी लागू झाल्यापासून पोलिसांनी निवडणूकपूर्व दक्षतेची सर्व कामे पूर्ण केली असून, या अनुषंगाने पोलीस जवानांना आवश्यक प्रशिक्षण देऊन सरावही करून घेतला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कोणतीही दयामया न दाखविता पोलीस कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिला आहे.
पैसे, शस्त्रे जप्त
गेल्या महिनाभरात पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. त्यात विशेषत: आचारसंहिता अंमलबजावणीच्या काळात अवैध रोख रकमेच्या वाहतुकीवर पोलीस नजर ठेवून होते. महिनाभरात पोलिसांनी १५ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

Web Title: Heads up, make the police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.