शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांना ‘डेडलाईन’

By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST

बीड : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांची संचमान्यता आता आॅनलाईन होणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना १५ जानेवारीची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे

बीड : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांची संचमान्यता आता आॅनलाईन होणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना १५ जानेवारीची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. सहसंचालकांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये याबाबतच्या सूचना दिल्या.३० सप्टेंबर २०१४ रोजीच्या पटसंख्येवरुन आॅनलाईन संचमान्यतेच्या नोंदी करावयाच्या आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. त्यातील प्रपत्रात शाळेच्या संदर्भातील माहिती भरावयाची आहे. एकूण ९ रकाण्यात माहिती द्यायची आहे. आॅनलाईन संचमान्यतेमुळे शाळांबद्दची कुठलीच माहिती दडविता येणार नाही. संचमान्यता आॅनलाईन केल्याशिवाय विद्यार्थी, शिक्षकांना कुठलेच लाभ न देण्याचा टोकाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे काम वाढले आहे. मुख्याध्यापकांनी संचमान्यता केल्यानंतर मोबाईल किंवा संगणकावरुन आॅनलाईन ही माहिती केंद्रप्रमुखांना कळवायची आहे. त्यानंतर केंद्रप्रमुखांमार्फत ‘डाटा’ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जाईल. गटशिक्षणाधिकारी माहिती तपासून चुका दुरुस्त करतील अन् अंतिम डाटा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवतील. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कारभारात पारदर्शकता येणार असून शिक्षण विभाग ‘पेपरलेस’ होणार आहे.राज्याचे शिक्षण सहसंचालक सुनील मगर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्षणाधिकारी (प्रा.) बी. ए. तुपे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना दिल्या.हलगर्जी कराल तर मुकाल!उपशिक्षणाधिकारी (मा.) धनंजय शिंदे म्हणाले की, आॅनलाईन संचमान्यता प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य आहे. ही माहिती मुख्याध्यापकांनी वेळेत द्यावी. अन्यथा संचमान्यतेशिवाय शाळांना कुठलेच लाभ मिळणार नाहीत. शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ यापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे मुख्याध्यापकांनी संधी दवडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्याध्यापकांनी आवश्यकता भासल्यास शिक्षण विभागाची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.यापूर्वीच सूचनाआॅनलाईन संच मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही मुख्याध्यापकांनी प्राथमिक माहिती संकलित करून ठेवली आहे. मात्र, असे असले तरी काही मुख्याध्यापकांना आॅनलाईन प्रक्रिया जमेल की नाही याबाबतच शंका आहे. मुख्याध्यापक मोबाईलवरूनही माहितीचा एसएमएस करू शकतात. (प्रतिनिधी)शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळेचे नाव, पूर्ण पत्ता, यूडायएस क्रमांक, मुख्याध्यापकांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक, शाळा व मुख्याध्यापकांचे मेल आयडी, १ जानेवारी २०१५ रोजी कार्यरत मान्य शिक्षक पदे, सध्या कार्यरत शिक्षकसंख्या, पदवीधर, उपशिक्षणाधिकारी संख्या, ३० सप्टेंबर २०१४ रोजीची पटसंख्या, एकूण वर्ग संख्या, एकूण खोल्या ही माहिती भरावयाची आहे.