शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

स्वतःच भोसकून घेत लुटल्याचा केला बनाव; गुन्हे शाखेने केला प्रकरणाचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:46 PM

बनाव असल्याचे २४ तासांत गुन्हे शाखेने केला उघड

औरंगाबाद : दोन लुटारूंनी उचलून नेत पैसे न दिल्यामुळे चाकूने भोसकून पाचशे रुपये लुटल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यातील फिर्यादीनेच स्वत:वर चाकूने वार करून लुटल्याचा बनाव केल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. जयप्रकाश राधाकृष्ण परदेशी (५७, रा. बनेवाडी) असे बनाव करणाऱ्याचे नाव आहे.

जयप्रकाश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पाटबंधारे विभागातील चाळीसगाव येथे चौकीदार आहेत. ते बनेवाडी येथील नातेवाईकांकडे आले होते. ७ डिसेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी पायी जात असताना अयोध्यानगरी गणपती मंदिराच्या पाठीमागे काही अंतरावर दोन लुटारूंनी त्यांना अडविले. लुटारूंनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यांनी पैशांची मागणी केली. परदेशी यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी उचलून जंगलात नेले. त्याठिकाणी एकाने हात धरून दुसऱ्याने पोटात व गळ्याजवळ चाकूने वार केले. त्यांच्या खिशातील पाचशे रुपये घेऊन पोबारा केल्याचे म्हटले होते. छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

बनाव असल्याचे २४ तासांत उघडतपास अधिकारी सपोनि. पांडुरंग भागिले यांच्यासह उपनिरीक्षक पुंडलिक डाके, गणेश केदार यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वेळेत तफावत आढळल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच वेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सपोनि. मनोज शिंदे, उपनिरीक्षक रमाकांत पटारे, हवालदार संतोष सोनवणे, भगवान शिलोटे, नितीन देशमुख, गीता ढाकणे यांनीही तपासचक्रे फिरविली. घटनेच्या वेळी परदेशी रेल्वे स्टेशन चौकातील सीसीटीव्हीत दिसत होता. खोलात गेल्यावर परदेशीनेच स्वत:वर चाकूने हल्ला करून घेतल्याचे वास्तव समोर आले.

परदेशी कर्जबाजारीपरदेशी यांना दोन अपत्ये असून, मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा वर्षभरापूर्वी पुरात वाहून गेला तेव्हापासून ते आणि पत्नी सतत दु:खात राहायचे. काहीसा बदल म्हणून नातेवाईकांनी त्यांना औरंगाबादला आणले होते. त्यांच्यावर १२ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे देणेकऱ्यांनीही तगादा लावल्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद