शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

उत्साहाची दिवाळी यंदा बेताचीच!

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

औसा : मागील चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेती उत्पादनात घट झाली असल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर झालेला पहावयास मिळत आहे़

औसा : मागील चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेती उत्पादनात घट झाली असल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर झालेला पहावयास मिळत आहे़ सध्या दिवाळीनिमित्त बाजारपेठ गजबजली असली तरी बाजारात खरेदी मात्र बेताचीच होताना दिसतेय़् दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत वर्दळ वाढली तरीही ती किराणा दुकाने आणि कपड्यांची दुकानांत खरेदी मर्यादित होत आहे़औसा तालुका हा तसा शेती व्यवसायावर असवलंबून असलेला तालुका आहे़ तालुक्यात शासकीय नोकरांची संख्या बऱ्यापैैकी असली तरीही नोकरदार मात्र लातूर व अन्य मोठ्या शहरात राहत असल्यामुळे तसेच राजकीय कार्यकर्तेही शहराच्या ठिकाणीच वास्तव्य करीत असल्याने औश्याच्या बाजारपेठेला तसा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचाच आधार आहे़ गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाअभावी शेती व्यवसायच कोलमडून पडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे़ शेती व्यवसायावरच ज्यांची उपजिविका अवलंबून आहे, असे शेतकरी तर संकटात सापडले आहेत़ अनेकांनी बैैलबारदाना मोडला़ शेती हिश्यावर अथवा पैश्याने दिली़ पण निसर्गाचं दुष्टचक्र काही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही़ यावर्षी तालुक्यात ६२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली़ एक तर पेरण्यांना झालेला एक महिन्याचा विलंब आणि त्यानंतरही पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात झालेली घट आणि पुन्हा बाजारात पडलेले भाव़ आता हाती आलेल्या सोयाबीनवरच वर्षभराची गुजराण करावी लागणार असल्यामुळे शेतकरी बेताचीच दिवाळी साजरी करताना दिसतोय़् बाजारपेठ जरी गजबजली असली तरी किराणा आणि कापड बाजारच बऱ्यापैैकी हालला आहे़ अन्य ठिकाणची खरेदी मात्र अभावानेच दिसतेय़ वास्तविक पहाता या सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणात दरवर्षी खरेदी होत असते़ परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हात मोकळा सोडून खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)