शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर पदांपैकी निम्मेच पोलीस कर्मचारी

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

परळी : १९ वर्षांपूर्वी परळी शहर ठाण्याला १२६ पदे मंजूर झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून सद्यस्थितीला केवळ ५७ पोलीस कर्मचारीच कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

परळी : १९ वर्षांपूर्वी परळी शहर ठाण्याला १२६ पदे मंजूर झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून सद्यस्थितीला केवळ ५७ पोलीस कर्मचारीच कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.शहराची लोकसंख्या वाढत असल्या कारणाने परळी शहर पोलीस ठाण्याला १२६ पदे मंजूर करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने सर्वाधिक पदे या ठाण्याला मंजूर करण्यात आली होती. मात्र वर्षागणिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. परळी शहर ठाण्यात केवळ ८६ पोलीस कर्मचारी आहेत. त्यापैकी .एसडीपीओ अंबाजोगाई ४, पोलीस मुख्यालय बीड २ व तालुका डीएसबी एक असे ७ पोलीस कर्मचारी ड्युटीसाठी कायम बाहेरगावी असतात. तर साप्ताहिक सुट्टी, किरकोळ रजा घेणाऱ्यांची संख्या २२ आहे. उरलेले ५७ पोलीस कर्मचारी दररोज वेगवेगळी कामे करतात. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यास दिवसाआड रात्रपाळी करावी लागते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, परळी शहर पोलीस ठाण्याला मंजूर पदापेक्षाही जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही आपण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी सांगितले. (वार्ताहर)ुजिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यातील पोलीस कर्मचारी घेऊन दरोडा प्रतिबंधक पथक, दंगल विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. ज्या ठाण्यांना जेवढ्या पोलिसांची गरज आहे तेवढे कर्मचारी देण्यात आलेले आहेत. गरज भासल्यास पोलीस कर्मचारी देण्यात येतात, असे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.