शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

हळदीला आला भाव

By admin | Updated: July 17, 2017 00:32 IST

नांदेड: शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रूपयांनी खरेदी केलेली हळद आता साडेआठ हजार रूपयेप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे़

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पावसाने दिलेल्या ओढीनंतर मोंढा बाजारात हळदीचा विक्रमी भाव वाढला असून यापूर्वी शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रूपयांनी खरेदी केलेली हळद आता साडेआठ हजार रूपयेप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे़ सध्या नांदेडच्या नवा मोंढा बाजारात गत महिनाभरापासून शेतकऱ्यांकडील उर्वरित हळदीची आवक सुरु आहे. गेल्या हंगामात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा एप्रिलपासूनच जिल्ह्यातून हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली़ दिवसाकाठी किमान १ ते दीड हजार क्विंटल हळदीची खरेदी-विक्री होत होती़ सध्या ८०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे़ गत आठ दिवसांपासून बाजारात हळदीच्या भावाने उसळी घेतली़नवा मोंढा बाजारात सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेमध्ये लिलाव पद्धतीने हळदीची विक्री करण्यात येते. हळदीची दिवसेंदिवस वाढत जाणारी आवक यामुळे दरामध्येही मोठी घसरण झाली़ प्रारंभी हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर ७५०० ते ८ हजार रुपयांवर आला होता. तर पुन्हा त्यात घसरण होत मे, जून महिन्यात ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत हळदीची विक्री झाली़ खरीप पेरणीचा हंगाम आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने खरेदीदार मागतील त्या दरामध्ये हळदीची विक्री करावी लागली़ दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत हळदीची खरेदी करण्यासाठी जवळपास ८ ते १० खरेदीदारांना बाजार समितीने खरेदीसाठी परवानगी दिलेली आहे. या खरेदीदारांकडून हळदीची कोट्यवधीची उलाढाल होते़ शेतकऱ्यांनी आपली हळद मे, जून महिन्यात कमी भावात विकल्यानंतर गत महिनाभरापासून पावसाने चांगलीच ओढ दिली़ त्यामुळे बाजारपेठेत हळदीचे भाव पुन्हा वधारले़ शेतकऱ्यांकडे साठवून ठेवलेली असलेली हळद बाहेर आली असून काही मोजक्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे़ शेतकऱ्यांच्या मालाची कमी दराने खरेदी करून अधिक दराने विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आता चढ्या भावाचा लाभ मिळणार आहे़