शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आंघोळीविना पहिल्यांदाच गुढीपाडवा!; औरंगाबाद महापालिकेच्या नावाने नागरिकांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 2:44 PM

सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगरमध्ये नागरिकांचा संताप

औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच औरंगाबादकरांना शनिवारी आंघोळीविना नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा करावा लागला. सिडको-हडकोसह जळगाव रोडवरील विविध वॉर्डांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मागील ७ दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. प्रत्येक वॉर्डात महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवक वॉर्डात पायही ठेवू शकत नाहीत, एवढे वातावरण तापले आहे. पाणी प्रश्न पेटलेला असताना लोकसभा निवडणुकांसाठी मते मागायला कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते. पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक नागरिक वर्षभर वाट पाहतात. पाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी पाडव्याच्या दिवशी नागरिकांना  आंघोळ करून पूजा करायची असते. घरासमोर गुढी उभारावी लागते. हे धार्मिक विधी आंघोळीशिवाय शक्यच नाहीत. घरात आंघोळीसाठी पाणीच नसेल तर पाडवा कसा साजरा करणार? शिवसेना-भाजप युतीचे प्राबल्य असलेल्या वॉर्डातील नागरिकांना पाडव्याच्या दिवशी मनपाने एक थेंबही पाणी दिले नाही. सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगर आदी वॉर्डांतील नागरिकांना मागील सहा ते सात दिवसांपासून पाणीच देण्यात आलेले नाही.

घरात पिण्यासाठीही पाणी नसल्याचे चित्र आहे. पाणी प्रश्नावरून नागरिक वैतागून घर सोडत असल्याने अनेक नगरसेवकांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. वॉर्डातील नागरिकांनी फोन केला तर अनेक नगरसेवक फोनच उचलत नाहीत. नगरसेवकांनी सहज वॉर्डात फेरफटका मारला तर नागरिक पाण्यासाठी भंडावून सोडत आहेत. वॉर्डात पाय ठेवणेही नगरसेवकांना मुश्कील झाले आहे. शनिवारी ‘लोकमत’प्रतिनिधीने टीव्ही सेंटर भागातील विविध वॉर्डांमध्ये फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले. महापालिका वेळेवर पाणी देऊ शकत नसेल तर किमान टँकरने नागरिकांना पाणी द्यायला हवे. 

जाधववाडीत दोन एप्रिलला पाणी दिलेजाधववाडी भागात २ एप्रिल रोजी अत्यंत कमी दाबाने मनपाने पाणीपुरवठा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत पाणीच आले नाही. कधी येईल, याचाही नेम नाही. अधिकारी नगरसेवकाचे अजिबात ऐकत नाहीत. टँकर देत नाहीत. पाण्यामुळे नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन मोकळे व्हावे असेही काहींनी नमूद केले.

तीन आठवड्यांपासून पाणी नाहीसुदर्शननगर भागात तर नागरिकांना तीन आठवड्यांपासून पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होतो. महापालिकेने पाण्याची वेळ बदलूनही पाणी दिल्यास वीजपुरवठा खंडित होतो. मोटार लावल्याशिवाय एक हंडाही पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी तरुणांनी टाकीवर भांडणे करून एक टँकर आणला होता. टँकरने पाणी देताना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते.

मयूरनगरचे हालमयूरनगर भागात मागील ७ दिवसांपासून पाणी आले नाही. नगरसेवक दररोज पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात. अधिकारी म्हणतात, प्रलंबित पाण्याचे टप्पे झाल्यावर तुमच्या वॉर्डाला पाणी देण्यात येईल. नेमके कधी देणार हे सांगत नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपातWaterपाणी