शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मनपावर पालकमंत्र्यांची टीका

By admin | Updated: January 4, 2016 00:24 IST

औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली.

औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली. पालिकेचा कारभार म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा पद्धतीने सुरू आहे. उत्पन्न वाढीला भरपूर वाव आहे, पण त्याकडे पालिकेचे लक्ष नाही, असे कदम म्हणाले. मनपाने यापुढे स्वत:च निधी उभा करून समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पालकमंत्री कदम आज पहिल्यांदाच औरंगाबादेत आले. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राकडून पुढील टप्प्यातील निधी मिळणार नसल्यामुळे मनपाच्या समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजना अडचणीत आल्या आहेत. त्यांना राज्य सरकार मदत करणार का, या प्रश्नावर पालकमंत्री कदम म्हणाले, मनपाच्या कारभाराचे मला नवल वाटते. खरे तर मनपाला पैशांची अजिबात कमी भासण्याचे कारण नाही,पण नियोजनाअभावी इथे उलट परिस्थिती आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अवघे १८ टक्के आहे. शिवाय शहरातील ५० ते ६० टक्केइमारतींना अजूनही मालमत्ताकर लागलेला नाही. सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केले तर आणखी चार- पाचशे कोटी रुपये सहज जमतील. त्यामुळे कुणाकडेही हात पसरायची गरज भासणार नाही. म्हणून आता मनपानेच योग्य नियोजन करून निधी उभारावा आणि त्यातून दोन्ही योजनांची कामे करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, मनपातील सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती. एमआयएमकडूनही स्वागतपालकमंत्री कदम यांचे शहरात जोरदार स्वागत झाले. विमानतळावर आणि सुभेदारी विश्रामगृहावर त्यांच्या स्वागतासाठी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एमआयएमकडूनही पालकमंत्र्यांचे स्वागत केले गेले. एमआयएमतर्फे कदम यांनी यापुढे समांतर जलवाहिनीच्या कामावर आपले लक्ष असेल, असे स्पष्ट केले. समांतरमधील दोन कलाकार मला ठाऊक आहेत. त्यातील एक कलाकार नुकताच गेला, अजून एक राहिला आहे. ४त्याच्यावरही माझे लक्ष आहे, असे कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले. मुळात समांतरचे करारच चुकीचे झाले, त्यामुळेच आज अडचणी उभ्या राहत आहेत, असा आरोपही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. पालकमंत्री कदम यांनी कचरा पेट्यांच्या अखर्चिक निधीवरूनही मनपावर टीकेची झोड उठविली. कचरा पेट्यांच्या खरेदीसाठी मनपाला आम्ही जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला, पण चार पाच महिने झाले तरी तो निधी मनपाने खर्च केलेला नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच बाजूला बसलेल्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांना उद्देशून त्यांनी उद्याच मनपा आयुक्तांना बोलावून घ्या आणि विचारणा करा, अशी सूचनाही केली.