शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पालकमंत्री सावंत; त्यांना नाही उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:35 AM

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून २३ फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकरणाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देसरकारी आणि राजकीय लवाजमा कचरा प्रकरणाशी जोडला गेला असतानाही ३३ दिवसांपासून शहरातील कचर्‍याची समस्या सुटू शकली नाही. उलट पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

- विकास राऊत  

औरंगाबाद : नारेगावातील डेपोत कचरा टाकण्यासाठी आसपासच्या १४ गावांतील नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनासमोर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून २३ फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकरणाकडे पाठ फिरविली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री असून, शहरातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येचाही त्यांनी आढावा घेतलेला नाही. 

सरकारी आणि राजकीय लवाजमा कचरा प्रकरणाशी जोडला गेला असतानाही ३३ दिवसांपासून शहरातील कचर्‍याची समस्या सुटू शकली नाही. उलट पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. कचर्‍याची समस्या तशीच जनजागृती आणि प्रक्रियेसाठी जागा नसल्याने कचरा शहराच्या गल्लीबोळात राजकीय मुद्दा बनू लागला आहे. 

कदम असते तर चित्र वेगळे असते पालकमंत्री डॉ.सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आॅफर ठोकपणे आंदोलकांसमोर मांडता आल्या नाहीत. त्यामुळेच कचरा डेपोचे प्रकरण लांबले. तासाभराच्या बैठकीने हा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. दरम्यान तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यशैलीची कचरा डेपो प्रकरणात गरज होती, असे सेनेच्या एका गटाला वाटते आहे. निर्णयक्षमता आणि यंत्रणेकडून काम करून घेण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे कचर्‍याचा प्रश्न सुटला असता. शिवाय यंत्रणेला हतबल होऊन जागेसाठी भटकंतीची वेळ आली नसती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पालकमंत्री म्हणाले होते...शहरात दोन ते तीन जागा कचरा टाकण्यासाठी वापरता येतील. त्या जागांचा आढावा घेऊन तीन ते चार दिवसांत व्यवस्था केली जाईल. प्रक्रिया प्रकल्पाला पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्याचा प्रशासकीय कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.४कचरा टाकण्यास २४ फेबु्रवारीपासून सुरुवात होईल. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने काळजीपूर्वक विचार केला जाईल, असे पालकमंत्री २३ फेबु्रवारी रोजी म्हणाले होते. ३३ दिवसांत त्यांनी कचरा प्रकरण मुंबईतूनच हाताळले असून, ग्राऊंडवर येऊन काहीही आढावा घेतलेला नाही. शिवाय स्थानिक  प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शनही केले नाही. याप्रकरणी पालकमंत्री डॉ.सावंत यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाguardian ministerपालक मंत्री