शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

By सुमित डोळे | Updated: January 5, 2024 12:31 IST

केंद्रीय जीएसटी पथकाची छत्रपती संभाजीनगरासह, लातूर, धाराशिवला कारवाई

छत्रपती संभाजीनगर : अस्तित्वातच नसलेल्या सिमेंट कंपन्यांच्या नावे कोटींची बिले उचलून मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा झाला. यात सुमारे १०० ते १५० कोटींची अफरातफर झाली असून शहरातील एका व्यक्तीच्या नावे एक कंपनी दाखविण्यात आली होती. त्याला पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले.

सूत्रांच्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बोगस बिले दाखवली जात असल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाला मिळाली होती. यात लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमधील काही व्यावसायिकांनी जालना जिल्ह्यात ८ ते ९ सिमेंट विक्रीच्या बोगस कंपन्या स्थापन केल्याचा बनाव रचला. त्यातून पैसे उचलण्यासाठी रस्ते, पाणी पुरवठा योजना कंत्राटदारांना बोगस बिले दिली. याद्वारे त्यांनी सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी बुडवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

अनेक सीएंची मदतसंबंधितांना जालना, छत्रपती संभाजीनगरमधील अनेक सीएंनी मदत केल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्याकडून बोगस बिल घेतलेल्या कंत्राटदारांचा पथकाकडून शोध सुरू होता. दरम्यान, शहरातील एकाने संबंधित घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांच्या उलाढालीचे व्यवस्थापन सांभाळले. ही मदत केल्याचे पुरावे पथकाला मिळाले होते. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अस्तित्वातच नसलेल्या सिमेंट कंपन्यांच्या नावाने बिले उचलली जात असताना कुठल्याच स्थानिक सरकारी विभागाला कळले कसे नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान अटकेसंबंधी स्थानिक पोलिसांकडून कुठलाही दुजोरा मिळाला नाही.

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीlaturलातूरOsmanabadउस्मानाबाद