शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस् अ‍ॅपचा ग्रुप अ‍ॅडमिन अटकेत

By admin | Updated: June 18, 2014 01:39 IST

औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे

औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे; पण जो अशा ग्रुपचा म्होरक्या आहे, त्याला भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांची पुसटशीही कल्पना नाही. कायद्याचे तसूभरही ज्ञान नाही. अशा एका ग्रुप अ‍ॅडमिनवर आज पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.शेख कलीम शेख सिराजोद्दीन (२२, ह.मु. जोगेश्वरी, मूळ रा. मांजरी, ता. गंगापूर), असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् अ‍ॅपवरील एका ग्रुप अ‍ॅडमिनचे नाव आहे. शेख कलीम हा वाळूज येथील होंडा शोरूममध्ये वसुलीचे काम करतो. तो एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. शेख सिराजोद्दीन यांच्या नावाचे कलीमकडे सीम कार्ड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपचा एक ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये त्याच्या फेसबुक अकाऊंटमधील मित्रांना परस्पर सदस्य बनवले. विशेष म्हणजे, फेसबुकवरही त्याच्या बहुतांश अनोळखी मित्रांचा भरणाच अधिक आहे. परवा रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिनेश अशोक बियाणी (रा. चुनाभट्टी, गांधीनगर) हा घराबाहेर अमन राऊत या आपल्या मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी अमन राऊतच्या ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. त्यात एका देवाचे विडंबनात्मक चित्र होते. ते अमन राऊत याने दिनेश बियाणी यास दाखवले. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते आपल्या काही मित्रांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले व तेथे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते चित्र राजस्थानमधून टाकले गेलेगुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरील ग्रुप अ‍ॅडमिनचा शोध घेतला असता तो जोगेश्वरी येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शेख कलीम यास अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता व्हॉटस् अ‍ॅपवर ते चित्र राजस्थान येथील रोमिओ आसेफ या तरुणाने ग्रुपमध्ये टाकल्याचे त्याने सांगितले. रोमिओ हा शेख कलीमचा फेसबुक मित्र आहे. कलीम त्याला प्रत्यक्ष कधी भेटलाही नाही व त्याच्याशी कधी बोललादेखील नाही, हे विशेष! या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत.