शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार

By बापू सोळुंके | Updated: January 28, 2023 13:02 IST

कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : अपारंपरिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीनको एनर्जी कंपनीने गतसप्ताहात दाओस येथे राज्य सरकारसोबत १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. आता या प्रकल्पांना ग्रीन सिग्नल मिळत असल्याने राज्यसरकारने ग्रीनकोसाेबत करार केल्याची उद्याेगक्षेत्रात चर्चा आहे. नव्या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार २०० एकर जमिनीची कंपनीला आवश्यकता असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

दाओस येथील आंतरराष्ट्रीय इकोनॉमिक फोरममध्ये ग्रीनको एनर्जी या कंपनीसोबत राज्यसरकारने १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. ही कंपनी औरंगाबाद जिल्ह्यात गुंतवणूक करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. येथील ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात सुमारे साडेचार ते पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. येथे ग्रीनको एनर्जी येईल असे बोलले जात होते. मात्र या कंपनीला बिडकीन डीएमआयसीमधील महागडी जमीन नकोय. डोंगराळ आणि जेथे मुबलक पाणी आहे, अशा जमिनीवर पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्याची कंपनीची तयारी आहे. हे प्रकल्प उभारणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये म्हैसमाळ आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथील जमिनीची पाहणी करून ती जमीन निवडल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. म्हैसमाळ आणि नायगाव येथील जमिनींपैकी काही जमीन वन विभागाची तर काही जमीन शेतकऱ्यांची आहे.

पाटबंधारे विभागाचा ६० कोटी ४९ लाख ५४ हजारांचे प्रस्तावित बिलाचे कोटेशन पाटबंधारे विभागाने शासनास सादर केलेल्या अहवालात ग्रीनको कंपनीचा प्रस्ताव मंजूर केल्यास ग्रीनको एनर्जीला सिंचन पुनर्स्थापना खर्च ४९ कोटी २६ लाख ३४ हजार २०० रुपये, प्रथम वर्षीची पाणीपट्टी ८ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये, प्रतिवर्षी भरावी लागणारी पाणीपट्टी २ कोटी ८० लाख ८० हजार असे एकूण पहिल्या टप्प्यात ६० कोटी ४९ लाख ५४ हजार २०० रुपयांचे प्रस्तावित बिलाचे कोटेशन शासनास सादर केले होते.

पाटबंधारे विभागाला प्रस्तावबॅकवॉटरमधून पाणी उपसा करून पाइपलाइनद्वारे म्हैसमाळ येथे नेऊन तेथे जलविद्युत निर्मिती करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला ग्रीनको कंपनीने सन २०१९ मध्ये दिला होता. या प्रस्तावात त्यांनी .६२ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. म्हैसमाळ येथे दोन साठवण तलावाची निर्मिती ते करणार आहे. या प्रस्तावानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे तात्कालीन कार्यकारी संचालक कोहीनकर यांनी शासनास सविस्तर अहवाल पाठविला होता. या प्रस्तावानंतर पुढे सहा महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सरकार बदलले. आता पुन्हा ग्रीनको कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली.

प्रस्ताव आला आहे ग्रीनको एनर्जी कंपनीचे अधिकारी काही दिवसापूर्वी आमच्याकडे जायकवाडी प्रकल्पातील पाण्यासंबंधी ऊर्जेचा प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. कंपनीचा काही वर्षांपूर्वीही प्रस्ताव आला होता.-जयवंत गवळी, मुख्य अभियंता, जलव्यवस्थापन आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादelectricityवीजEknath Shindeएकनाथ शिंदे