‘लोकमत महामॅरेथॉन’बदल धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता; ऑनलाइन रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 12, 2023 16:12 IST2023-12-12T16:10:03+5:302023-12-12T16:12:15+5:30
१७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉनमध्ये जिंकण्यासाठी धावपटू प्रचंड मेहनत घेत आहेत.

‘लोकमत महामॅरेथॉन’बदल धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता; ऑनलाइन रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे नावनोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातील धावपटूही यात सहभागी होत आहेत.
विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी, १७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉनमध्ये जिंकण्यासाठी धावपटू प्रचंड मेहनत घेत आहेत. या प्रतिष्ठेच्या महामॅरेथॉनमध्ये मीच बाजी मारणार, असा आत्मविश्वास प्रत्येक धावपटू व्यक्त करीत आहे. एरवी एकटे धावणे व महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूसोबत धावणे यात मोठा फरक आहे, म्हणूनच तर धावपटू वर्षभर ‘लोकमत महामॅरेथॉन’ची प्रतीक्षा करीत असतात. याची प्रचिती नावनोंदणीवरून येत आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे, तसतशी धावपटूंची नावनोंदणी वाढत आहे आणि आपला सहभाग निश्चित करून घेत आहे. अनेक जण ग्रुपने यात सहभागी होत आहेत, तसेच अनेक जण आपल्या फॅमिलीची नावनोंदणी करीत आहेत. ऑनलाइन नावनोंदणी आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. यामुळे ज्यांना या महामॅरेथॉनमध्ये ‘याची देही याची डोळा’ अनुभव घ्यायचा आहे. त्यांनी आता वेळ न दवडता लगेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे, कारण रजिस्ट्रेशन बंद झाल्यावर होणारी निराशा टाळण्यासाठीही शेवटची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे.
ग्रुप रजिस्ट्रेशनला मोठा प्रतिसाद
महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी असो वा कंपनीमधील कर्मचारी, अधिकारी, तसेच कॉलन्यामधील मित्रमंडळ सर्व जण ग्रुप रजिस्ट्रेशन करीत आहेत. २५ ते ५० जणांच्या ग्रुप रजिस्ट्रेशनला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.
निरोगी आयुष्याचा संदेश
लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन अनेक जण ‘निरोगी आयुष्याचा’ संदेश शहरवासीयांना देणार आहेत. आम्ही धावतो, तुम्हीही नावनोंदणी करून आमच्यात सहभागी व्हा, असे आवाहनही सोशल मीडियावर धावपटू करत आहेत.