ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज
By Admin | Updated: March 23, 2016 01:09 IST2016-03-23T00:34:40+5:302016-03-23T01:09:16+5:30
बीड : वाशिम जिल्ह्यात एका ग्रामसेवकाने विस्तार अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी येथे उमटले. ग्रामसेवकांनी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.

ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज
बीड : वाशिम जिल्ह्यात एका ग्रामसेवकाने विस्तार अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी येथे उमटले. ग्रामसेवकांनी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.
ग्रामसेवक संजय शेळके यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर १२ दिवस उलटूनही कारवाई होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. पं.स. समोर घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष नारायण बडे, बळीराम उबाळे, सरचिटणीस कल्याण राऊत, तालुकाध्यक्ष उमेश हुलजुते, रवींद्र हावळे, एस.के. देशमुख, मधुकर चोपडे, दत्ता नागरे, दिलीप मिसाळ, मधुकर शेळके, एस.एम. चव्हाण, बी.जी. राठोड, केशर चौधरी, एस.एम. कांबळे, बाबूरान नन्नवरे, ए.व्ही. पुजारी आदी उपस्थित होते.
ग्रामसेवकांवर गेल्या काही दिवसांपासून सतत अन्याय, अत्याचार होत आहेत. वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अनियमितेचे खापर ग्रामसेवकांवर फोडले जाते. त्यामुळे वाशिममध्ये एकाला प्राणास मुकावे लागले. हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा नारायण बडे, उमेश हुलजुते यांनी दिला. जिल्हाधिकारी, बीडीओंना निवेदन दिले. (प्रतिनिधी)