शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक, उपसरपंचास अटक,जामीन

By admin | Updated: September 6, 2014 00:27 IST

मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले.

मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे़२०१२ मध्ये तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीला तंटामुक्त अभियानातून २ लाख ३५ हजारांचे बक्षीस मिळाले होते़ ही रक्कम गावच्या विकास योजनेसाठी खर्च करायची होती़ पण सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामसेवकांनी बनावट ग्रामसभेचा ठराव घेवून या रकमेतून गावात पथदिवे बसविण्यात आल्याचे ठराव घेवून व पुणे येथील निर्मल पॉवर कंपनीकडून पथदिवे बसविण्याचे काम करण्यात आल्याचे कंपनीचे खोटी बिले व शपथपत्र सादर करून २ लाख रुपये बँकेतून परस्पर उचलले़ याबाबत डोंगरगावातील नागरिक बडदू जैनोद्दीन सय्यद यांनी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशान्वये पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी तहसीलदार यांनी चौकशी केली असता ग्रामसेवकांनी पथदिवे व लावताच २ लाख रुपये उचलल्याचे व सदर रक्कम उपसरपंच राजू धनगे यांच्याकडे दिल्याचे शपथपत्रकाद्वारे कबूल केले असता तहसीलदाराने तंटामुक्तीच्या पैशात अपहार करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश मुखेड पोलिसांना दिले़पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी सय्यद याने अ‍ॅड़एस़ एस़ गोपछडे यांच्यामार्फत मुखेड न्यायालयात याचिका दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशाने ९ डिसेंबर २०१३ रोजी आरोपी राजू धनगे (विद्यमान उपसरपंच), राजाबाई गवाले (तत्कालीन सरपंच), खातीजाबी आजमोद्दीन (तत्कालीन उपसरपंच), बाबू हैदर सय्यद (तंटामुक्ती अध्यक्ष), शेख हुसेन चाँदसाब (तत्कालीन ग्रामसेवक) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ पण गुन्हे दाखल होवूनही आरोपी मोकाटच असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश देताच यातील आरोपी राजू धनगे, ग्रामसेवक व तंटामुक्ती अध्यक्ष यांना अटक करण्यात आली़ या तिघांना तपासासाठी पोलिस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता पोलिस प्रशासनाने आरोपींना अटक करण्यास दिरंगाई केल्याने आरोपींना न्यायालयाने जामीन दिला़ (वार्ताहर)