ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार

By Admin | Updated: May 25, 2014 01:05 IST2014-05-24T01:19:30+5:302014-05-25T01:05:48+5:30

तामलवाडी : १३ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली कामे, चोरीस गेलेले पीव्हीसी पाईप, काम होण्यापूर्वीच गुत्तेदाराला दिलेली

In the Gramsab | ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार

ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार

तामलवाडी : १३ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली कामे, चोरीस गेलेले पीव्हीसी पाईप, काम होण्यापूर्वीच गुत्तेदाराला दिलेली रक्कम आदी विविध कारणांवरून सांगवी (काटी ता़तुळजापूर) येथे शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत आरोपांच्या फैरी करण्यात आल्या़ समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने सरपंचासह ग्रामसेविकेस ग्रामस्थ, सदस्यांनी फैलावर घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता़ सांगवी काटी येथे १ मे रोजी आयोजित ग्रामसभा कोरमअभावी रद्द करण्यात आली होती़ नंतर २२ दिवसांनी आज ही ग्रामसभा बोलाविण्यात आली़ सरपंच अनिता माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोति ग्रामसभेत ग्रामसेविका एस़एस़घुगे यांनी नळपट्टी, घरपट्टीसह इतर विविध कर व १३ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी व त्यातून केलेल्या कामांची माहिती दिलीग़तवर्षी गावात केलेली टाकी आणि त्यात न येणारे पाणी या विषयावरून ग्रामसभेत गोंधळास सुरूवात झाली़ या कामात पाईप निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला़ तसेच ३० जून पर्यंत नव्याने पाईपलाईन करण्याचा ठराव यावेळी एकमताने पारित करण्यात आला़ सदस्यांना विश्वासात न घेता टंचाईकाळात ग्रामपंचायतने खरेदी केलेले १६ पीव्हीसी पाईपांबाबत विचारणा झाली असता सरपंचांनी ते चक्क चोरीस गेल्याची माहिती दिली़ या उत्तराने खवळलेल्या सदस्यांसह ग्रामस्थांनी त्याबाबत तक्रार का नोंदविली नाही यावरून रणकंद घातले़ पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांकडून याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ तसेच अनेक कामे अपूर्ण असतानाही ग्रामसेविकांनी गुत्तेदाराला निधी वितरित केल्याच्या कारणावरूनही गोंधळ झाला़ या गोंधळातच ग्रामसभेतील ठराव संमत करण्यात आले़ यावेळी उपसरपंच हरिभाऊ मगर, भीमराव मगर, बेगम शेख, अप्पाराव मगर, बाबूराव मगर, शंकर माने, शरद मगर, शिवाजी शिंदे, श्रीकांत कुलकर्णी, शाहू मगर, मोहन मगर, विष्णू मगर, मधुकर मगर, हेमंत जोशी, लक्ष्मण मगर, बाबूराव मगर, मुरलीधर मगर, कृषी सहाय्यक राहूल जाधव, मोहन जाधव, सतीश जोशी, नामदेव मगर, शहाजी मगर, महेश मगर, बाळू माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)सांगवी काटी ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत़ मात्र, येथे शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेस सदस्या अनिता माने, बेगम शेख, हरिभाऊ मगर, भीमराव मगर हे चार सदस्यच हजर होते़ दुपारी एक वाजता बोलाविण्यात आलेल्या सभेस इतर पाच सदस्यांनी या ग्रामसभेस दांडी मारली़

Web Title: In the Gramsab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.