शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सिरळी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत ग्रामसभा

By admin | Updated: July 13, 2014 00:29 IST

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी गाव कुरूंद्याला जोडण्यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, तीन कि.मी. रस्ता बांधकाम झाले तर २० कि.मी.चे अंतर कमी होवून सिरळी मुख्य प्रवाहास जोडले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.शुक्रवारी सायंकाळी सिरळी येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेस जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, डावरे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अनसिंगकर, सरपंच सीमा नलगे, उपसरपंच नागोराव जांबुतकर यांच्यासह तालुकास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.या ग्रामसभेचे प्रास्ताविक तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशासन ग्रामस्थांच्यादारी आले आहे. या ग्रामसभेद्वारे गावाच्या समस्या सोडवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सिरळी गाव आडरस्त्याला आहे. मुख्य बाजारपेठेशी जोडणारा जवळचा रस्ता नाही. सर्कलचे गाव कुरूंदा असले तरी ३५ कि.मी. अंतर पार करावे लागते. यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, हा रस्ता झाला तर अंतर २० कि.मी. कमी होवू शकते, यासाठी हा रस्ता त्वरीत व्हावा, अशी एकमुखी मागणी केली. या शिवाय आदिवासी बहुल गाव सिरळीस ठक्कर बाबा योजना लागू करावी आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)