शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीसाठी बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. संवेदनशील २३ गावांमधील मतदान केंद्रावर बंदूकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले.जिल्ह्यात दुसºया टप्प्यातील २३२ पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, शनिवारी २२४ ग्रामपंचायतींसाठी ७११ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. सरपंच पदाच्या २२४ जागांसाठी ६८८ तर सदस्यपदाच्या दोन हजार ३६१ जागांसाठी ३५७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने महसूल विभागाचे ५१ झोन तयार केले आहेत. या सर्व झोनमध्ये पेट्रोलिंगसाठी ५१ सेक्टर तयार करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यासाठी एक स्ट्राँगरुम तयार करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी निवडणुकीच्या काळात दाखल गुन्ह्यातील आरोपी, समाजकंटक व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी पाच पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक , ५१ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, एक हजार १६५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक, औरंगाबाद पोलीस आयुक्तालय आणि विभागाच्या वनसरंक्षक जवानांचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंगोली येथील राज्य राखीव दलाची एक तुकडी, पोलीस नियंत्रण कक्षात चार दंगा नियंत्रण पथके व दोन जलद कृती दलाची पथके राखीव ठेवली आहेत. बंदोबस्ताच्या अनुषंगाने आवश्यक सर्व तयारी झाल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.