शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बंद पडलेल्या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव सरकारने फेटाळला; राज्य सरकारचा कुलगुरूंना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:35 IST

याविषयीचे पत्र शासनाने कुलसचिवांना पाठविल्यानंतरही विद्यापीठाने कोणतेही पाऊल उचलले नाही.

औरंगाबाद : मोहाडी (ता. कन्नड) येथील दहा वर्षांपासून बंद असलेल्या महाविद्यालयाला पुनर्संलग्नता देऊन महाविद्यालयाला मान्यता देण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाने फेटाळून लावला आहे. याविषयीचे पत्र शासनाने कुलसचिवांना पाठविल्यानंतरही विद्यापीठाने कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट एमकेसीएल आणि इतर ठिकाणी मान्यता फेटाळलेल्या महाविद्यालयासाठी खास व्हीआयपी ट्रीटमेंट चालू असल्याचे चित्र आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मोहाडी (ता. कन्नड) येथील दहा वर्षांपासून बंद असलेल्या महाविद्यालयाला पुनर्संलग्नता देण्याचा नियमच विद्यापीठ कायद्यात नसल्यामुळे विद्यापरिषदेत जून २०१७ मध्ये ठराव घेऊन मान्यता दिली नाही. तरीही यानंतर जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत शासन निर्णयाच्या अधीन राहून संलग्नता देण्याचा ठराव मंजूर करीत शासनाकडे पाठवला. हा ठराव फेटाळला असताना, संबंधित बृहत आराखड्याच्या बिंदूसाठी दुसरे महाविद्यालय सुरू केल्यानंतर हा प्रस्ताव मान्यच कसा केला, असा सवाल राज्य सरकारने उपस्थित केला आहे. 

सातपुडा विकास मंडळाने (ता. रावेर) २००१ मध्ये मोहाडी येथे सुरू केलेले कला महाविद्यालय २००६-०७ मध्ये टप्प्याटप्प्याने बंद केले. यानंतर संस्थेने २०१३ मध्ये संबंधित संस्थेने नूतनीकरणाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विद्यापीठाने डॉ. माधव सोनटक्के  यांची समिती स्थापन केली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार २९ जून २०१३ रोजीच्या बैठकीत पुनर्संलग्नीकरणाचा प्रस्ताव फेटाळला. यानंतर संस्थेने ८ जून २०१६ रोजी पत्र देऊन २०१२ ते २०१७ दरम्यानच्या शैक्षणिक संलग्नता देण्याची मागणी केली. यानुसार पुन्हा डॉ. भगवान गव्हाडे आणि डॉ. सतीश पाटील यांच्या दोन समित्या पाठविण्यात आल्या.

या दोन्ही समित्यांनी संलग्नता देण्याची शिफारस केली. या समितीचा अहवाल २० जून २०१७ च्या विद्यापरिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला. मात्र, विद्यापीठ कायद्यानुसार पुनर्संलग्नीकरण देण्याची तरतूदच नसल्यामुळे प्रस्ताव नामंजूर केला. यानंतर कुलगुरूंनी या महाविद्यालयाला भेट दिली. ९ जानेवारी २०१८ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत शासन मान्यतेच्या अधीन राहून पुनर्संलग्नीकरण देण्याबाबत ठराव मंजूर केला. हा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. शासनाकडून मान्यता येण्यापूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत ऐनवेळी महाविद्यालयाला संलग्नता देण्यासाठी समिती पाठविण्याचा ठराव मंजूर केला.

या समितीच्या अहवालानंतर कुलगुरूंनी मागील महिन्यात २७ सप्टेंबर रोजी विशेषाधिकारात महाविद्यालयाला संलग्नता देण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्याच दिवशी शासनाने महाविद्यालयाला नियमबाह्यपणे संलग्नता देता येणार नसल्याचे स्पष्ट करणारे पाच पानी पत्रच पाठविले आहे. तरीही यावर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतेही पावले उचललेली नाहीत.

परीक्षा अर्ज भरल्याची तारीख गेल्यानंतर प्रवेशया महाविद्यालयाला २५ सप्टेंबर रोजी कुलगुरूंनी विशेष अधिकारात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी मान्यता दिली. त्यापूर्वीच विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत संपली होती. १५ आॅक्टोबर रोजी परीक्षा सुरू होणार आहेत.  यावरून मान्यतेपासून प्रवेशापर्यंत सर्वच प्रक्रिया बोगस असल्याचे स्पष्ट होते.

मोठा आर्थिक व्यवहारमोहाडीच्या बंद पडलेल्या महाविद्यालयाला पुनर्संलग्नीकरण देण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी, व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने मोठा आर्थिक व्यवहार केला असल्याची माहिती समोर आली आहे.  बंद पडलेले महाविद्यालया सुरु करुन देण्याची सुपारीच एका सदस्याने घेतली असून त्याला कुलगुरु आणि प्रकुलगुरु बळी पडले असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता कुलगुरु आणि प्रकुलगुरु दोघेही तोंडघशी पडले आहेत. राज्य सरकारने प्रस्ताव फेटाळल्यानंतरही प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय