लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘युती सरकारनं गेल्या तीन वर्षांत महाराष्टÑाचं वाटोळं केलेलं आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढतच चाललेल्या आहेत. नागपूर तर गुन्हेगारीची राजधानी झालेली आहे. अन्य सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. बेरोजगारी तर वाढतच चालली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लाखो नोक-यांवर गदा आलेली आहे. केवळ बालिश नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक असे हे सरकार आहे. या सरकारला आपला वाढदिवस साजरा करण्याचा काहीही अधिकार पोहोचत नाही, असे हे सरकार पायउतार झाल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.काल रात्री उशिरा त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले, तेव्हा त्यांचे रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. नांदेड मनपातील विजयानंतर ते पहिल्यांदाच औरंगाबादला आले होते. आज सकाळी त्यांनी गांधी भवन, शहागंजात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर सुभेदारी गेस्ट हाऊसवर चव्हाण यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.मराठवाड्याची अवस्था बिकट...महाराष्टÑातल्या रस्त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. विशेषत: मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था आणखीनच खराब आहे. मराठवाड्याचा जणू विकासच खुंटला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.राज्य सरकारवर तुटून पडताना अशोकराव चव्हाण यांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजीची ही तीन वर्षे राहिली. खोटी आश्वासनं दिली गेली आणि अंमलबजावणी मात्र शून्य राहिली. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे.४शेती, शेतक-यांचे प्रश्न, महिला, दलित, अल्पसंख्याक, शिक्षण, रोजगार अशा सर्व आघाड्यांवरची या सरकारची कामगिरी अयशस्वी ठरली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे तर देशाचं आणि महाराष्टÑाचं वाटोळं झालं आहे.
युतीला सरकारचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:43 IST