शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

शिक्षण व लघु उद्योगांसाठी कॅनडा सरकारचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 9:31 PM

व्यापारविषयक शिष्टमंडळ औरंगाबादच्या भेटीवर

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीमुळे औरंगाबाद शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. प्रचंड मेहनतीच्या बळावर येथील उद्योजक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवीत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही येथील उद्योजकांना कॅ नडामध्ये कंपनी विस्तारासाठी मदत करणार आहोत. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीचा हात आम्ही देऊ, असा विश्वास कॅ नडाचे भारतातील उच्चायुक्त अँड्र्यू स्मिथ यांनी व्यक्त केला.

इंडो-कॅनडियन बिझनेस चेंबर (आयसीबीसी) एअर कॅ नडाच्या वतीने औरंगाबादेतील उद्योजक, तसेच विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी ‘ब्रँड कॅ नडा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ताज हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात कॅनडामध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी व सहकार्याच्या बळावर उद्योग करणे किती सोपे होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी अँड्र्यू स्मिथ म्हणाले, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाढणाऱ्या भारतात व्यापारविषयक संधी अनेक आहेत. विशेषत: औरंगाबादसारख्या शहरात व्यापार, शिक्षण, पर्यटन, तसेच वस्त्रोद्योगात मोठ्या संधी दिसून येतात. भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतही औरंगाबाद शहराचा समावेश होतो. शैक्षणिकदृष्ट्याही हे शहर नावाजलेले आहे. त्यामुळे कॅ नडा सरकारतर्फे  आम्ही शिक्षण आणि पर्यटन, उद्योग क्षेत्राशी संबंध मजबूत करू इच्छितो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि स्वच्छतेच्या दृष्टीने झालेला विकास ही कॅ नडाची बलस्थाने असून, ‘ब्रँड कॅ नडा’मार्फ त जास्तीत जास्त उद्योजक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

यावेळी ‘आयसीबीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नादिरा हामीद म्हणाल्या की, भारत आणि कॅ नडादरम्यान व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करीत असून, ही मोहीम संपूर्ण भारतभरात विस्तारणार आहोत. भारतातील सर्वाधिक आर्थिक घडामोडी महाराष्ट्रात घडत असून, औरंगाबादचे त्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे या शहराशी आमचे व्यापारी संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा आहे. 

या कार्यक्रमात स्थानिक लघु उद्योजक, विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नाथ ग्रुप (फूड चेन), एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. (आयटी), तसेच काही कन्सल्टिंग एजन्सीजचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 

व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्याची मोहीमभारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ‘ब्रँड कॅ नडा’ ही मोहीम सुरू आहे. १३ जानेवारी रोजी हरयाणातील गुरुग्राम येथे या मोहिमेची सुरुवात झाली. त्यानंतर मंगळवारी औरंगाबादेत हा कार्यक्रम झाला. यापुढील टप्प्यात कॅ नडाचे हे शिष्टमंडळ पुण्यातील उद्योजकांची भेट घेणार आहे. यावेळी कॅनडाचे व्यापारविषयक विभागाचे अ‍ॅलन डिसुजा, अमित मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCanadaकॅनडाEducationशिक्षणbusinessव्यवसाय