एक लाख पुस्तके मिळाली
By Admin | Updated: May 21, 2014 00:49 IST2014-05-21T00:46:20+5:302014-05-21T00:49:22+5:30
हिंगोली : सर्वशिक्षा अभियानांतर्गत हिंगोली तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ९ हजार ४२५ पुस्तके मिळाली
एक लाख पुस्तके मिळाली
हिंगोली : सर्वशिक्षा अभियानांतर्गत हिंगोली तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ९ हजार ४२५ पुस्तके मिळाली असून, आणखी ५० टक्के पुस्तके मिळणे बाकी आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. या अंतर्गत हिंगोली तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याकरीता एकूण १ लाख ९ हजार ४२५ पुस्तके मंगळवारी तालुक्याला प्राप्त झाली आहेत. यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची प्रत्येकी ४ हजार २३२, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी याच विषयांची प्रत्येकी ४ हजार ३१८, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीही गणित, इंग्रजी व परिसर अभ्यास विषयांची प्रत्येकी ३ हजार ३८८ पुस्तके मिळाली आहेत. तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास, विज्ञान या विषयाची प्रत्येकी ५ हजार ३०४ तर सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाची प्रत्येकी ४ हजार ९५८ पुस्तके मिळाली आहेत. सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञानाची प्रत्येकी ३ हजार ८७७ तर इंग्रजी विषयाची ४ हजार ९६५ पुस्तके मिळाली आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयाची २ हजार ६५७, हिंदी विषयाची ३ हजार २६१, विज्ञान विषयाची ३ हजार ६६४ पुस्तके मिळाली आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विद्यालयातून १३ पैैकी ११ केंद्रीय मुख्याध्यापकांनी पुस्तके हस्तगत केली आहे. या पुस्तक वाटपासाठी गटसमन्वयक मुकुंद केंद्रेकर, विषय साधन व्यक्ती श्रीमती एल. टी. डोंगरे विशेष परिश्रम घेत आहेत. उर्वरित मुख्याध्यापकांनी त्वरीत पुस्तके हस्तगत करावीत, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी ए. टी. मुदीराज यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)