गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

By Admin | Updated: August 7, 2014 01:28 IST2014-08-07T00:29:16+5:302014-08-07T01:28:44+5:30

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़

Gosvodaya Center gets a similar shape | गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़ परंतु त्याला अद्याप मूर्तरूप मिळाले नसल्याने मन्याड खोऱ्यासह लगतच्या जिल्ह्यातील बळीराजाची उपेक्षा चालूच असल्याने शेतकरी-पशुपालकांतून संताप व्यक्त केला जात आहे़
मन्याड खोऱ्यातील लालकंधारी पशुधन आकाराने बांधेसुद, डौलदार, आकर्षक, मजबूत व देखणे आहे़ चपळ, सालस, हुशार आणि शेतीसाठी उपयुक्त आहेत़ पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील तत्कालीन अधिष्ठाता गफूर आणि माजी खा़ व आ़ डॉ़ भाई केशवराव धोंडगे यांनी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला़ आणि लालकंधारी जात ही इतर जातीपेक्षा भिन्न असल्याची मान्यता मिळविली़ त्यानंतर या पशुधनाची व्याप्ती वाढावी, पशुपालकांना शेतीसाठी जोडधंदा व्हावा, आर्थिक स्तर वाढावा, यासाठी लालकंधारी गोसंवर्धन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली़ १९८७ साली गऊळ येथे केंद्र स्थापन करण्यात आले़ लालकंधारी गोसंवर्धन केंद्र हे सतत समस्येचा सामना करत राहिले़ जमिनीचा प्रश्न, वर्ग-३ चे कर्मचारी निवासस्थान, पाणीप्रश्न, खावटी अनुदान आदीमुळे केंद्र व बळीराजा पेचात सापडला़ लालकंधारी पशुधनाचे संगोपन करणाऱ्या बोरी, उमरज, कारतळा, हासूळ, गऊळ, पोखर्णी, पानशेवडी, उमरगा, वाखरड, मसलगा, आंबुलगा, फुलवळ, हरबळ, वहाद, भोजूचीवाडी, घागरदरा, मुंडेवाडी, जांभूळवाडी आदी गावच्या पशुपालकांनी संगोपन केले़ परंतु केंद्राअभावी हाती निराशाच आली़ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालकंधारी नर पशुधनाची जोडी ८० ते ९० हजाराला बाजारात विक्री होते़ गायीची प्रजनन क्षमता व दुधासाठी वरदान असलेले पशुधन शासनाच्या उदासीनतेमुळे केंद्राचे स्वरूप बदलले असून नाव सोनूबाई़़़ अशी अवस्था झाली आहे़ केंद्र आता उपचारापुरते उरले आहे़
लालकंधारी पशुधनातून शेतीसाठी जोडधंदा तेजीत राहिला असता़ गोवसंवर्धन नसल्याने शेतीचे नुकसान झाले तर आर्थिक उभारी घेता आली असती़ मार्चमध्ये गारपीट झाली़ आता पावसाळा असूनही शिवाराचा उन्हाळा शिल्लक झाला आहे़ (वार्ताहर)
१९८८ ला सुरु झाले केंद्र
तत्कालीन मुख्यमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी १९८८ ला केंद्राचे उद्घाटन केले़ केंद्राची व्याप्ती गऊळसह, घागरदरा, पानशेवडी, आंबुलगा, कंधारेवाडी, सोमठाणा, सावरगाव, हरबळ होती़ त्यामुळे पशुपालकाच्या आनंदाला पारावार उरला नाही़ आनंदाला आलेली भरती दीर्घकाळ टिकू शकली नाही़ नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन झाले़ आणि गऊळचे केंद्र गऊळ, भोजूचीवाडी, फुलवळ, मुंडेवाडी, सावरगाव, हरबळ, घागरदरा गावापुरते मर्यादित राहिले़

Web Title: Gosvodaya Center gets a similar shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.