छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी; चंदीगढ, अमृतसर, दिल्लीसाठी सुटणार विशेष रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:38 IST2026-01-21T15:37:41+5:302026-01-21T15:38:37+5:30

प्रवाशांच्या गर्दीवर रेल्वेची मात! २३ ते २६ जानेवारी दरम्यान विशेष गाड्यांचे नियोजन; छत्रपती संभाजीनगरमार्गे नांदेड, चेरलापल्ली, दिल्ली, चंदीगढ आणि अमृतसरसाठी विशेष गाड्यांचे नियोजन

Good news for Chhatrapati Sambhajinagarkars; Special trains will leave for Chandigarh, Amritsar, Delhi, Nanded and Cherapalli! | छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी; चंदीगढ, अमृतसर, दिल्लीसाठी सुटणार विशेष रेल्वे!

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी; चंदीगढ, अमृतसर, दिल्लीसाठी सुटणार विशेष रेल्वे!

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या निवारणासाठी उत्तर रेल्वेकडून चंदीगढ, हजरत निजामुद्दीन (दिल्ली), अमृतसर येथून नांदेड, चेरलापल्लीसाठी विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. या रेल्वे छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणार आहेत.

अमृतसर - चेरलापल्ली विशेष रेल्वे २३ व २४ जानेवारी रोजी अमृतसरहून पहाटे ३:३५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला दुसऱ्या दिवशी दुपारी २:१५ वाजता पोहोचेल. पाच मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे रवाना होईल. चेरलापल्ली येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता पोहोचेल.

चेरलापल्ली - अमृतसर विशेष रेल्वे चेरलापल्ली येथून २५ व २६ जानेवारी रोजी दुपारी ३:४० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला पहाटे ३:४० वाजता येईल. पाच मिनिटांनी रवाना होईल. अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी दुपारी ३:१० वाजता वाजता पोहोचेल.

चंदीगढ - हुजूरसाहिब नांदेड विशेष रेल्वे ही चंदीगढ येथून २३ व २४ जानेवारी रोजी पहाटे ५:४० वाजता सुटेल. अंबाला, पानिपत, दिल्ली, आगरा, झांशी, बिना, भोपाल, इटारसी, खांडवा, भुसावळ, मनमाडमार्गे दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला सकाळी ८:१३ वाजता येईल व ८:१५ वाजता रवाना होईल. जालना, परभणी, पूर्णा मार्गे नांदेड येथे दुपारी १:३० वाजता पोहोचेल.

हुजूरसाहिब नांदेड - चंदीगढ विशेष रेल्वे नांदेड येथून २५ व २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला मध्यरात्री १:१५ वाजता येईल आणि पाच मिनिटांनंतर पुढे रवाना होईल. चंदीगढ येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.

हजरत निजामुद्दीन - हुजूरसाहिब नांदेड विशेष रेल्वे हजरत निजामुद्दीन येथून २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता सुटेल. ही रेल्वे पालवल, आगरा, झांशी, बिना, भोपाल, इटारसी, खांडवा, भुसावळ, जालगाव, मनमाडमार्गे छत्रपती संभाजीनगरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२० वाजता येईल आणि १०:२५ वाजता रवाना होईल. नांदेड येथे दुपारी ४:२० वाजता पोहोचेल.

नांदेड - हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वेची वेळ
हुजूर साहिब नांदेड - हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे नांदेड येथून २४ व २५ जानेवारी रोजी रात्री ८:१० वाजता सुटेल. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरला मध्यरात्री १२:१८ वाजता येईल व १२:२० वाजता रवाना होईल. ही रेल्वे हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११:२० वाजता पोहोचेल.

Web Title : छत्रपति संभाजीनगर से चंडीगढ़, अमृतसर, दिल्ली के लिए विशेष ट्रेनें!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के लिए खुशखबरी! उत्तर रेलवे यात्री यातायात को प्रबंधित करने के लिए छत्रपति संभाजीनगर के माध्यम से चंडीगढ़, दिल्ली और अमृतसर के लिए विशेष ट्रेनें चलाएगा। ट्रेनें 23 से 26 जनवरी के बीच चलेंगी।

Web Title : Special trains for Chhatrapati Sambhajinagar to Chandigarh, Amritsar, Delhi!

Web Summary : Good news for Chhatrapati Sambhajinagar! Northern Railway will run special trains to Chandigarh, Delhi, and Amritsar via Chhatrapati Sambhajinagar to manage passenger traffic. Trains will operate between January 23rd and 26th.