शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ तहानलेलाच

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

दगडू सोमाणी, गंगाखेड पावसाने चक्क पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठचा भाग तहानला असून डोंगरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत.

दगडू सोमाणी, गंगाखेडचालू वर्षाच्या पावसाळी हंगामात पावसाने चक्क पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठचा भाग तहानला असून डोंगरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ३१ तालुक्याच्या भूजल पातळीत घट झाली आहे़ तालुक्यातील भूजलपातळी दीड मीटरपेक्षा अधिक पाणी पातळी घटल्याचा अहवाल यंत्रणेने सादर केला आहे. मुख्य पावसाळ्यात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी घटीचा उलटा प्रवास सुरू झाल्याने भविष्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असल्याचे निर्देश जेएसबीए यंत्रणेने दिले आहेत. गंगाखेड तालुक्याची क्षेत्रफळानुसार गोदाकाठचा सुपीक व डोंगरी अशा दोन भागात विभागणी होेते. गोदाकाठच्या भागात गोदावरी पात्रात मुळी येथे बंधारा असल्यामुळे मुळी, दुस्सलगाव, खळी, चिंच टाकळी, महातपुरी, गौंडगाव, पोंहडूळ आदी भागात पाण्याची पातळी टिकून आहे. मात्र गंगाखेड, धारखेड, झोला, पिंपरी, नागठाणा, धसाडी, अंगलगाव, मसला आदी गावे गोदाकाठावर असून नदीच्या पात्रात पाण्याचा ठणठणाट असल्याने पावसाळ्यातही ही गावे तहानली आहेत. या परिसरातील सुपिक भागात असणाऱ्या ४० ते ५० गावातील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. दरवर्षी गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन ते चार वेळा पूर येत असल्यामुळे जमिनीतील भूजल पातळीत वाढ होत होती. मात्र यावर्षी मागील २० ते २५ वर्षानंतर प्रथमच पावसाळी हंगामात पूर तर सोडाच नदीच्या पात्रात साधे पाणी सुद्धा आले नाही. याहीपेक्षा बिकट अवस्था डोंगरी भागातील ग्रामस्थांची झाली आहे. यावर्षीचे पर्यजन्यमान आजपर्यंत केवळ २० टक्के झाल्याने भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घट होत आहे. डोंगरी भागात असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त असा १९ टक्के जलसाठा आहे. मासोळी प्रकल्पातून गंगाखेड शहर, गंगाखेड शुगर कारखाना व अन्य १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध पाणी साठा केवळ एक ते दोन महिन्यांचा असून भविष्यात मासोळी प्रकल्पावर विसंबून असलेल्या गंगाखेड शहरासह अन्य पंधरा ते वीस गावांना पावसाळा संपण्यापूर्वीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात सहा लघू प्रकल्प आहेत. यापैकी तांदूळवाडी २४ टक्के, राणीसावरगाव २० टक्के, टाकळवाडी ५ टक्के, पिंपळदरी ३३ टक्के तर कोद्री व नखतवाडी येथे ० टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा वर्ष २०१३ मधील आहे. यावर्षी लघू प्रकल्पातील पाणी साठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. वर्ष २०१३ मध्ये ही सर्व लघू प्रकल्प आॅगस्ट अखेरपर्यंत १०० टक्के भरली होती. गंगाखेड तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७०० मि. मी. एवढी आहे. २१ आॅगस्टपर्यंत केवळ १२८ मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील मुख्य पाऊस पडणारी नक्षत्र कोरडी गेली. यापुढे मोठ्या पावसाची अपेक्षा धुसूर झाल्याने भूजल पातळीत वाढ होण्याची अपेक्षा कमी आहे. शेवटी निसर्गाची कृपादृष्टी झाली तरच भूजल पातळी वाढीची अपेक्षा करता येईल अन्यथा तालुक्यातील गोदाकाठ व डोंगरी भागात भीषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याचे दृष्टीक्षेपात येत आहे.