शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी देण्याचे देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:47 PM

वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेला पत्नीपीडित पुरुषांनी छेद देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देपत्नीपीडितांची अनोखी पिंपळ पौर्णिमापत्नीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना

वाळूज महानगर : पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी दे म्हणत सिडको वाळूज महानगरात शनिवारी (दि.१५) पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून अनोख्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरी केली.

वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला सात जन्मी हाच पती मिळू दे व पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करतात. मात्र, वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेला पत्नीपीडित पुरुषांनी छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नानंतर महिलांनाच त्रास होतो, अशी सामाजिक धारणा आहे; पण महिलांकडून पुरुषांना त्रास होतो याचा सहसा कोणी विचार करीत नाही; पण महिलांनी कायद्याचा गैरवापर करून पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. काहीही संबंध नसताना या खोट्या तक्रारीमुळे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने, तसेच जिवापाड जपलेल्या पोटच्या मुलांपासून दूरू राहावे लागत असल्याने अनेक पत्नीपीडित पुरुष नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. या नैराश्यातून अनेक पत्नीपीडित पुरुष आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत. समाजव्यवस्थेच्या या विदारक परिस्थितीत पत्नीपीडित पुरुषांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्नीपीडित संघटना गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे. पत्नीपीडितांना न्याय मिळावा यासाठी भारत फुलारे यांनी पुढाकार घेऊन वाळूज महानगरात आश्रम उभारला आहे. संघटनेच्या माध्यमातून या आश्रमात पत्नीपीडितांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर लढा लढण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर पत्नीपीडितांना न्याय मिळावा यासाठी वेगवेगळी आंदोलने केली जातात.

पत्नीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थनावटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एकीकडे महिला पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात दंग आहेत, तर दुसरीकडे मात्र पत्नीच्या छळाने त्रस्त असलेले पीडित पुरुष एकत्र येऊन मागील वर्षापासून वेगळ्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरी करीत आहेत. यंदाही शनिवारी सिडको साईनगरातील पिंपळाच्या झाडाला पत्नीपीडित पुरुषांनी उलटे फेरे मारून पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली, तसेच सात जन्मी हाच पती मिळू दे, असे खोटे सांगून छळ करणाऱ्या लबाड बायकोच्या त्रासातून मुक्त कर. खोट्या गुन्ह्यात अडकवून छळ करणारी बायको नको रे बाबा, असे म्हणत पिंपळाच्या झाडाप्रमाणे आम्हालाही मुंजे ठेव, असे यमराजाकडे साकडे घातले. यावेळी पत्नीपीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे, बापू तरवटे, चरणसिंग गुसिंगे, शिवराज कांबळे, प्रवीण गाळे, पांडुरंग गांडुळे, जगदीश शिंदे, रामचंद्र बोपशेट्टी, भिकन चंदन, अ‍ॅड. प्रसाद, दिनेश मेव्हणकर, नीलेश भाले, संदीप घोळवे, भूषण डोळस, अ‍ॅड. डहाळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकmarriageलग्न