शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या सात शिक्षकांना पुरस्कार प्रदान

By admin | Updated: September 6, 2014 00:27 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील सात शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील सात शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड तर मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, सभापती रंगराव कदम, मधुकर कुरुडे, राजाभाऊ मुसळे, निलावती सवंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी केले. तर उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. प्राथमिक विभागातून पिंपळखुटा शाळेचे शिक्षक माधव कुंडलिक वायचाळ, शिवनी बु. शाळेच्या महानंदा मधुकरराव जोशी, वसमत कें.प्रा.शा.चे श्रीराम गणेशराव संगेवार, सुकळी बु. शाळेचे रमेश पांडुरंग काळे, गढाळा शाळेचे उत्तम शंकरराव वानखेडे तर माध्यमिकच्या कुरुंदा प्रशालेतील दैवशीला नारायण खेबाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जवळा बाजार शाळेतील क्रीडाशिक्षक सुबोध सुधाकरराव मुळे यांना विशेष शिक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे म्हणाले, रोजगारक्षम व संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. हे काम फक्त शिक्षकच करू शकतात. प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. तो भक्कम झाला पाहिजे. सभापती रंगराव कदम म्हणाले, हा पुरस्कार प्रातिनिधीक स्वरुपाचा आहे. अनेक शिक्षक उत्कृष्ट काम करतात. त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा.शिक्षणाधिकारी पवार म्हणाले, गुरू ही प्रेरणा आहे. त्यामुळेच यशाचा मार्ग सापडतो.उपाध्यक्ष गायकवाड म्हणाले, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम शिक्षक करतो. बालकांना नव्हे, तर देश घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते. अशा तमाम शिक्षकांचा गौरव करतो. सूत्रसंचालन अश्विनी कुरुंदकर यांनी केले. उपशिक्षणाधिकारी सोयाम यांनी आभार मानले.