शाळकरी मुलीवर बलात्कार करणारा नराधम अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 20:40 IST2018-11-26T20:39:49+5:302018-11-26T20:40:01+5:30
चितेगाव : पैठणखेडा येथे राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीला कुरकुरे खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतर समोर ...

शाळकरी मुलीवर बलात्कार करणारा नराधम अटकेत
चितेगाव : पैठणखेडा येथे राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीला कुरकुरे खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतर समोर आले. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी नराधम वृद्धाला अटक केली. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिने अखेर पोलिसांत फिर्याद दिली.
रावण लाव्हारे (वय ६५,रा. चितेगांव) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे. चितेगाव येथून जवळच असलेल्या पैठणखेडा येथील मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेते. मे महिन्यात शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच होती. त्यावेळी संधी साधून गावातील ओळखीच्या रावण लाव्हरे (६५) याने तिला कुरकुरे खायला दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला.
याप्रसंगामुळे घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. घटनेच्या दुसºया दिवशीही नराधमाने पीडितेचे आई-वडील घराबाहेर असल्याची संधी साधून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. ही बाब पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितली. त्याचे अत्याचार टाळण्यासाठी तो दिसला की, पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी जात अथवा त्यांना सोबत ठेवत.
चार दिवसांपूर्वी पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने नातेवाईक तिला घेऊन खाजगी रुग्णालयात आले होते. तेथे त्यांना पीडिता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यांनतर तिला घाटी रुग्णायलात हलविण्यात आले. तेथेही डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर पीडिता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा पीडितेच्या आई-बाबांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे याविषयी विचारणा केली तेव्हा तिने रावण लाव्हारेने मे महिन्यात केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. वृद्धाच्या धाकापोटी ही बाब लपविल्याचे सांगितले.
बिडकीन पोलिसांनी घाटीत जाऊन पीडितेची फिर्याद नोंदवून घेत नराधम रावणविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार हे तपास करत आहे.
------------------------------------------------------------------