शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

‘फ्रेंडशिप डे’च्या आदल्या रात्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:07 IST

परिचिताने आई आजारी असल्याचे सांगून नेले निर्जनस्थळी

ठळक मुद्देपोलिसांकडून नराधमाला अटक  संग्रामनगर रेल्वेरूळ परिसरात झाला अत्याचार

औरंगाबाद : आईची तब्येत खराब झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात न्यायचे आहे, अशी थाप मारून ओळखीच्या अल्पवयीन मुलीला (१६)  दुचाकीवर बसवून थेट निर्जनस्थळी नेऊन नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ३ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वेरूळ परिसरात घडली. जवाहरनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

शेरूसिंग गावंडी (२७, रा. गादिया विहार) असे आरोपीचे नाव आहे.  आरोपी आणि पीडिता हे  परिचयाचे आहेत. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, बालाजीनगर येथे आईसोबत राहणारी १६ वर्षीय तरुणी शनिवारी रात्री ७ वाजता धावणी मोहल्लातील गुरुद्वारात  दर्शनासाठी गेली होती. तेथून ती परतत असताना आरोपी शेरूसिंगने मोबाईलवर संपर्क साधून तिच्या आईची प्रकृ ती खराब झाल्याने  घाटी रुग्णालयात जायचे आहे. मी तुला घ्यायला येतो, तू तयार राहा, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून पीडिता गुरुद्वारासमोर उभी राहिली. आरोपी मोटारसायकलने तेथे आला. त्याच्या दुचाकीवर बसून ती घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एक मित्र येणार असून त्याच्याकडून पैसे घेऊन जाऊ, असे तो तिला म्हणाला. यानंतर तो तिला घेऊन संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील रेल्वेरूळाजवळ अंधारात दुचाकी थांबविली. तेथे दुचाकी उभी केल्यानंतर त्याचा कोणताही मित्र तेथे आला नाही. उलट त्याने पीडितेसोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. तो तिला बळजबरीने पुढे अंधारात ओढत एका झाडाखाली घेऊन गेला. आईकडे जायचे आहे, माझे दुसºया मुलासोबत प्रेम आहे, मला सोडून दे, अशी हात जोडून विनंती पीडिता त्याच्याकडे करीत होती. मात्र, तिचे काहीही न ऐकता तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेनंतर तो तिला घेऊन तेथील एका बीअर शॉपीपर्यंत आला. तिला तेथेच सोडून दिल्यानंतर तो दुचाकीवर बसून तेथून पसार झाला. 

रिक्षाने घर गाठले...या अत्याचारामुळे मानसिक आणि शारीरिक धक्क्यातच असताना तिने कशीबशी रिक्षा भाड्याने घेऊन घर गाठले. आई आणि मामाला घटनेची माहिती दिल्यानंतर ते तिला घेऊन जवाहरनगर ठाण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांनी फिर्याद नोंदवून घेतली आणि अवघ्या काही तासांत आरोपी शेरूसिंगला बेड्या ठोकल्या.

धार्मिक पोथी वाचननराधम शेरूसिंग हा शहरातील एका प्रार्थनास्थळी धार्मिक ग्रंथ वाचतो. दिवसातील १२ ते १५ तास तो प्रार्थनास्थळी असतो. तरीही त्याने  अल्पवयीनमुलीवर  अत्याचार केल्याने पोलीस व नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीआरोपी शेरूसिंगला रात्री बेड्या ठोकल्यानंतर रविवारी दुपारी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने शेरूसिंगला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस