शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनीसाठी तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

परंडा : शासनाने तालुक्यातील सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी द्यावी, अशी मागणी करीत पारधी समाजातील महिला पुरुषांनी येथील प्रभारी तहसीलदार पाडळे यांना घेराव घातला.

परंडा : कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शासनाने तालुक्यातील सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी द्यावी, अशी मागणी करीत पारधी समाजातील महिला पुरुषांनी येथील प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांना शनिवारी घेराव घातला. तसेच २ जूनपर्यंत याबाबत निर्णय नाही झाल्यास तहसीलसमोर उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास तहसील कार्यालयात पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने छायाचित्रासह मतदार याद्यांच्या निरंतर मतदार नोदणीसबंधी बैठक सुरू होती. याचवेळी पारधी समाजातील चितरंग्या वांग्या पवार, राहूल चितरंग्या पवार, गणेश चितरंग्या पवार, मनिबाई चितरंग्या पवार, उषाबाई येवरड्या पवार, रुपाली राहुल पवार, गुड्डी गणेश पवार, चिवळाबाई तयाशा काळे, माधुरी काळे यांनी तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्यांनी ‘अम्हाला जगू द्या, अम्हाला जगण्याची संधी द्या,’ अशी घोषणाबाजी करीत सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी देण्याची मागणी केली. यावेळी पारधी समाजातील महिलांनी प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांना घेराव घालून तब्बल अर्धा तास बैठकीचे कामकाज रोखून ठेवले. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार कुलकर्णी, समाजसेवक तु. दा. गंगावणे यांनी मध्यस्थी करुन आंदोलनकर्त्याना शांत केले. रितसर लेखी निवेदन द्या, यावर विचार केला जाईल. आपले म्हणणे शासनाकडे कळवू, असे अश्वासन प्रभारी तहसीलदार पाडळे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. दरम्यान, प्रशासनाने २ जूनपर्यत जमीन न दिल्यास तहसीलसमोर मुला-बाळासह व जनावरांसह बेमुदत अमरण उमोषणास बसणार असल्याचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिले. यावर नऊ जणांच्या सह्या आहेत. (वार्ताहर) संसारोपयोगी वस्तू परत करण्याची मागणी २२ मे रोजी सोनगिरी येथील गायरान जमिनीमधील अतिक्रमण काढल्यानतंर प्रशासनाने संसारोपयोगी वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याही परत मिळाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यावर सदरील वस्तू सोनगिरी ग्रामपंचयातीच्या ताब्यात असून, त्या परत करण्याच्या सूचना ग्रामसेवकास दिल्या जातील, असे पाडळे यांनी सांगितले. जमिनीचा फेरफार ग्रामपंचायतीच्या नावे याबाबत बोलताना प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे म्हणाले, सोनगिरी येथील गायरान जमीन ही ग्रामपंचयातीच्या मालकी हक्कास अनुसरुन आहे. या जमिनीचा फेरफार दस्त ग्रामपंचयातीच्या नावे आहे. यामुळे त्यावर अतिक्रमण करणे कायदेशीररित्या उचित नाही. निवेदनधारकांच्या मागण्या शासनास कळविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.