छत्रपती संभाजीनगर : ‘वर्ग तीन’च्या भांडारपाल पदाचे बनावट नियुक्तीपत्र घेऊन एक तरुण थेट घाटी रुग्णालयात रूजू होण्यासाठी हजर झाला. प्रशासकीय अधिकारी रजेवर असल्याने पत्र ठेवून घेण्यात आले. अधिक तपासात ते बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी सतीश काकाजी कोलते (रा. भालगाव, फुलंब्री) या नावाने नियुक्तीपत्र घेऊन गेलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ मार्चला दुपारी १ वाजता घाटीच्या प्रशासकीय विभागात दैनंदिन काम सुरू होते. यावेळी संशयित सतीश नावाचा तरुण विभागात गेला. कनिष्ठ लिपिक शेख अरबाज यांना त्याने ‘वर्ग तीन’चे भांडारपालचे नियुक्तीपत्र दाखवून रूजू होण्यासाठी हजर झाल्याचे सांगितले. प्रशासकीय अधिकारी महेश गावडे (५७) हे शासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते. लिपिक अरबाज यांनी त्यांना संपर्क करून ते नियुक्तीपत्र व्हॉट्स ॲपवर पाठवले. संशय आल्याने गावडे यांनी ते नियुक्तीपत्र ठेवून घेण्यास सांगितले. शहरात परतल्यानंतर त्यांनी खातरजमा केली. मात्र, या नियुक्तीचा ई-मेल किंवा पत्र घाटीला प्राप्त झाले नव्हते. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना याबाबतचा अहवाल पाठविला. सुक्रे यांनी सदर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे नमूद केल्यानंतर गावडे यांनी १७ मार्च रोजी बेगमपुरा पाेलिसांकडे तक्रार दाखल केली.
आरोग्य विभागाच्या नावे हुबेहूब नियुक्तीपत्रसंशयित सतीश कोलते नावाने सादर केलेल्या नियुक्तीपत्रावर 'महाराष्ट्र शासन आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष, चौथा मजला, शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय इमारत, फोर्ट, मुंबई ' असे स्पष्ट नमूद होते. शिवाय, सदर कार्यालयाचा जावक क्रमांक नमूद करून सरळसेवा/शिफारसपत्रानुसार भांडारपाल वर्ग ३, गट क संवर्गातील शिफारशीनुसार निवड केली असून पदस्थापना देण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यावर संबंधित कार्यालयाचा शिक्कादेखील होता. प्रत्यक्षात सदर पद हे पदोन्नतीचे असून सरळसेवेचे नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना अधिक संशय आला. सहायक पोलिस निरीक्षक मनिषा केदार पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A young man tried to join a hospital with a forged appointment letter for a storekeeper position. Suspicion arose; the letter proved fake. Police filed a case.
Web Summary : एक युवक ने भंडारपाल पद के लिए जाली नियुक्ति पत्र के साथ अस्पताल में शामिल होने की कोशिश की। संदेह होने पर पत्र नकली साबित हुआ। पुलिस ने मामला दर्ज किया।