गेवराईत दोघांवर कत्तीने वार
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:50:08+5:302014-06-14T01:19:29+5:30
गेवराई: तालुक्यातील ताकडगाव येथील युवकावर दोन जणांनी हातावर व डोक्यावर कत्तीने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराईत दोघांवर कत्तीने वार
गेवराई: तालुक्यातील ताकडगाव येथील युवकावर दोन जणांनी हातावर व डोक्यावर कत्तीने वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रामदास सुतार (वय-२५ रा. तागडगाव) असे मारहाणीत गंभीर झालेल्या युवकाचे नाव असून तो बुधवारी रात्री आपल्या घरी जात असताना गावातील विजय संदीपान जोंधळे व पांडुरंग चंदन मोटे हे दोघे पाठीमागून आले व संतोष सुतार यांच्या हातावर व डोक्यावर कत्तीने वार केले. यामुळे संतोष सुतार हा गंभीर जखमी झाला. तो आरडाओरडा करत असल्यामुळे जवळपासच्या लोकांनी त्याला दवाखान्यात नेले. दवाखान्यात त्याची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यास औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दुसरी घटना जातेगाव येथे घडली. गेवराईकडे येत असलेल्या ज्ञानेश्वर बाबूराव राठोड (रा.केकत पांगरी) याच्यावरही दोघांनी कत्तीने वार केले. ज्ञानेश्वर राठोड याच्या फिर्यादीवरून विजय जोंधळे व पांडुरंग मोटे यांच्या विरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. सुरेंद्र गंधम करीत आहेत. आरोपींना अटक केली आहे.(वार्ताहर)