७२ हजारांचा गुटखा पोलिसांनी पकडला
By Admin | Updated: June 22, 2014 00:10 IST2014-06-21T23:34:01+5:302014-06-22T00:10:24+5:30
पारध : भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांनी धावडा व धाड (ता.बुलढाणा) येथे छापे मारून ७१ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त केला.

७२ हजारांचा गुटखा पोलिसांनी पकडला
पारध : भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांनी धावडा व धाड (ता.बुलढाणा) येथे छापे मारून ७१ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बिडवे यांनी सहकारी एम.पी. ठाकूर, भगत, राजपूत, गजेंद्र भुतेकर, प्रकाश सिनकर व चालक संजय आढावे यांनी तात्काळ छापा मारला.
धावडा येथील बसथांब्यावरील कोमल मोबाईल शॉपीवर छापा मारून प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. दुकानाचा मालक कृष्णा प्रभाकर ठकारे याच्या ताब्यातून ६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
कृष्णा ठकारे ज्या व्यक्तिकडून माल विकत आणतो. त्याचा पत्ता घेऊन धाड येथेही लगेच छापा मारला. निर्मल स्वीट मार्ट या दुकानातून ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
मालक रामदास दांडगे यालाही ताब्यात घेण्यात आले. यानंतर अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. (वार्ताहर)