शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीपासून ९४० रूपयांना मिळणार गॅस

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

बीड : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची थेट अनुदान योजना जानेवारी २०१५ पासून बीड जिल्ह्यात सुरू होत आहे़

बीड : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची थेट अनुदान योजना जानेवारी २०१५ पासून बीड जिल्ह्यात सुरू होत आहे़ त्यासाठी डिसेंबर अखेर ग्राहकांना बँक खात्याशी संलग्नीकरण करून घेण्याची मुदत आहे़ जानेवारीपासून ९४० रूपयाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहे़पेट्रोलियम गॅस मंत्रालयाने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आॅफ एलपीजी सबसिडी’ ही ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची योजना सुरू केली आहे़ प्रातिनिधीक स्वरूपातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यापूर्वीच लागू झाली आहे़ जानेवारी २०१५ पासून महाराष्ट्रात सर्वत्र ही योजना सुरू होत आहे़ या योजनेंतर्गत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर धारकांना ९४० रूपयांप्रमाणे गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे़ त्याचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे़ यापूर्वी ज्यांनी या योजनेत सहभाग घेतला व त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलिंडरचे अनुदान जमा झाले अशांना काही करायची गरज नाही़ मात्र ज्यांनी सहभाग घेतला परंतु सबसिडी जमा झाली नाही त्यांनी नाव नोंदणीची स्थिती वितरकाकडून व पेट्रोलियम मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमाकांवर किंवा संकेतस्थळावरून जाणून घेणे गरजेचे आहे, असे बीड येथील एचपी गॅस वितरक आनंद सारडा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)४ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी आधार क्रमांक खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेला व गॅस वितरकांना द्यावयाचा आहे़ ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनी बँक खात्याची माहिती एलपीजी गॅस वितरकाला देऊन त्यांच्याकडून एलपीजी आयडी संबंधित बँकेला देऊन खाते संलग्नीत करून घ्यावयाचे आहे़ डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे़