गॅस सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: May 7, 2017 00:13 IST2017-05-07T00:12:02+5:302017-05-07T00:13:35+5:30
परंडा : स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत स्वयंपाकघर जळून खाक झाले.

गॅस सिलिंडरचा स्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
परंडा : स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत स्वयंपाकघर जळून खाक झाले. ही घटना परंडा तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार लोहारा येथील शेतकरी जयकुमार छगन दबडे यांच्या शेत वस्तीवरील घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघरातील गॅस टाकीचा शुक्रवारी दुपारी अचानक स्फोट झाला. यामुळे स्वयंपाकघराने पेट घेतला. या आगीत घरातील विद्युत पंप, केबल वायर, टॅक्टरचा नवीन टायर, ड्रीपचे पाईप यासह घरातील भांडी व इतर वस्तू खाक झाल्या. गॅस टाकीच्या स्फोटाचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, घटना घडली त्यावेळी दबडे कुटुंब वस्तीसमोरील झाडाखाली बसले होते. यामुळे जिवीत हानी टळली. आग लागल्याचे समजताच उपसरपंच उज्वल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, दशरथ दबडे, परशुराम पाटील, वर्धमान सावळे, महेश साठे, तुकाराम शिंदे आदींनी आग विझवीण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे संपूर्ण खोली जळून खाक झाली. यात दबडे यांचे मोठे नुकसान झाले.