शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात गॅससाठी रांगा थांबेनात; वितरण क्षमता १० हजार, मागणी ६० हजार सिलिंडरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:23 IST

सावळा गोंधळ: नागरिकांची घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी धडपड

छत्रपती संभाजीनगर : आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांसह गॅसपुरवठ्यावर दोन आठवड्यांपासून संकट आहे. दररोज जेवढे घरगुती गॅस सिलिंडर वितरण केले जायचे, त्याच्या पाचपट बुकिंग दररोज होत असल्याने गॅस वितरक एजन्सीसमोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात दररोज २० हजार १३० तर शहरात सरासरी १० हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरीत होणे शक्य आहे. असे असताना रोज ६० हजार सिलिंडरची रोज मागणी होऊ लागली आहे. हा सगळा प्रकार पाहून एजन्सीधारकांसह पुरवठा विभागही चक्रावून गेले आहे.

शहरात ११ लाख ७६ हजार गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा सुरू असली तरी गॅस सिलिंडर केव्हा मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे कुणालाही निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. इंडियन ऑइलकडे २ लाख ८३ हजार, इण्डेनकडे ४ लाख १० हजार तर बीपीसीएलकडे ४ लाख ८३ हजार सिलिंडर ग्राहक आहेत.

घरगुती गॅस सिलिंडर रिफील करण्यासाठी आवश्यक असलेला २९० टन गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २० मार्चला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत गॅस वितरकांची बैठक झाली होती परंतु गॅस पुरवठा सुरळीत झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला नसल्याचा दावा पुरवठा विभागाने केला.

जिल्ह्यात गॅस एजन्सी : ५७शहरात गॅस एजन्सी : २०एकूण गॅस एजन्सी : ७७शहरातील गॅस सिलिंडर पुरवठा क्षमता दररोज : १० हजारदररोज सिलिंडरची मागणी : ६० हजारप्रत्येक एजन्सीवर सरासरी रोज बुकिंग : ३ हजार

व्यावसायिक गॅसबाबत निर्णयाची शक्यताजिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याबाबत राज्य सरकारचा सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत केंद्र सरकारने गॅस वितरण कंपन्यांना सूचना केल्या आहेत. हाॅटेल, उद्योग व इतर व्यावसायिक संस्थांचा गॅस पुरवठा ५ मार्चपासून बंद आहे.

अतिरिक्त बुकिंगमुळे परिणामप्रत्येक गॅस एजन्सीकडे ३ ते ४ हजार सिलिंडरसाठी दररोज बुकिंग होत आहे. नियमित मागणीपेक्षा ही दुप्पट आहे. ग्रामीण भागात वितरण सुरळीत सुरू आहे. शहरातील गॅस एजन्सीसमोर सध्या रांगा आहेत. रिफिलिंगसाठी लागणारा गॅस पुरवठा नियमित सुरू आहे. व्यावसायिक गॅसपुरवठा करण्याबाबत शासन स्तरावरूनच निर्णय होईल. पहिले सिलिंडर घेतल्यानंतर दुसरे २५ दिवसांनी वितरण करण्याचे धोरण सध्या आहे.-प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Cylinder Queues Persist in Chhatrapati Sambhajinagar Amid Supply Concerns

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces gas cylinder shortages due to increased demand. Supply is 10,000 cylinders daily, while demand hits 60,000. Authorities held meetings, but long queues persist. Commercial gas decisions are awaited, impacting hotels and industries. Extra bookings strain agencies.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर