निष्क्रिय औरंगाबाद मनपाविरुद्ध ‘गार्बेज वॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:10 IST2018-04-09T00:09:22+5:302018-04-09T00:10:48+5:30

५० दिवस झाल्यानंतरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. केवळ बैठका आणि नियोजनाच्या गप्पांना नागरिक वैतागले आहेत. निष्क्रिय मनपाच्या विरोधात मंगळवारी (दि.१७) ऐतिहासिक शहरात ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कचऱ्याच्या समस्येला ६० दिवस पूर्ण होणार आहेत.

'Garbage Walk' against Inactive Aurangabad Municipal Corporation | निष्क्रिय औरंगाबाद मनपाविरुद्ध ‘गार्बेज वॉक’

निष्क्रिय औरंगाबाद मनपाविरुद्ध ‘गार्बेज वॉक’

ठळक मुद्देकनेक्ट टीम : पक्षविरहित नागरी ऐक्याची हाक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ५० दिवस झाल्यानंतरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. केवळ बैठका आणि नियोजनाच्या गप्पांना नागरिक वैतागले आहेत. निष्क्रिय मनपाच्या विरोधात मंगळवारी (दि.१७) ऐतिहासिक शहरात ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कचऱ्याच्या समस्येला ६० दिवस पूर्ण होणार आहेत.
औरंगाबाद कनेक्ट टीमतर्फे शहरात विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात पूर्णत: राजकीय पक्ष, संघटनाविरहित अशी नागरी ऐक्याची हाक देण्यात आली.
मनपा अधिकारी, पदाधिकारी नागरी समस्या सोडविण्यासाठी सक्षम नाहीत. या पदाधिकाºयांनी कचरा प्रकरणात सर्व सीमा पार केल्या असल्यामुळे नागरिकांची स्थिती सहन क रण्यापलीकडे गेली आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांचा एल्गार होत आहे. यात मनपा बरखास्तीची मागणीही करण्यात येणार आहे. याचवेळी शहरातील पदाधिकाºयांपासून ते मंत्रालयातील अधिकाºयांपर्यंत सर्वांना एसएमएस पाठवून दररोज नागरिकांच्या भावना कळविण्यात येणार आहेत. या बैठकीला अनेक संघटना-संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अजय शाह, महेंद्र खानापूरकर, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, श्रीकांत उमरीकर, दीपक देशपांडे, संजय पाठे, डॉ.रश्मी बोरीकर, सारंग टाकळकर, अ‍ॅड. गीता देशपांडे, सुलभा भाले, ज्योती नांदेडकर, सरस्वती जाधव, स्मिता अवचार, प्राचार्या मनोरमा शर्मा, सुलभा खंदारे, नरेंद्र मेघराजानी, अनंत मोताळे, हरीश जाखेटे आदींची उपस्थिती होती.
मंगळवारी सकाळी गार्बेज वॉक
‘गार्बेज वॉक’ची सुरुवात मंगळवारी सकाळी ९ वाजता पैठणगेट येथून होणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयासमोर त्याची सांगता होईल, असेही या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

Web Title: 'Garbage Walk' against Inactive Aurangabad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.